कल्याण लोकसभेचे कल्याण करण्यासाठी आलो आहे - अनुराग ठाकूर

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी उल्हासनगर मध्ये तीन दिवसीय दौऱ्याचा शेवट करीत पत्रकारांशी वार्ता केली.
कल्याण लोकसभेचे कल्याण करण्यासाठी आलो आहे - अनुराग ठाकूर

कल्याण लोकसभा ही मित्र पक्षाच्या ताब्यात असली तरी मागील तीन वर्षांत आघाडी सरकारने विकास रखडवला. आता कल्याण लोकसभा क्षेत्राचा रखडलेला विकास मार्गी लावून कल्याण लोकसभेचे कल्याण करण्यासाठी आलो असल्याचे केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले; मात्र कल्याण लोकसभा क्षेत्र पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजप सरसावली आहे का, या प्रश्नावर उत्तर देणे ठाकूर यांनी टाळले.

कल्याण लोकसभा प्रवास कार्यक्रम अंतर्गत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी उल्हासनगर मध्ये तीन दिवसीय दौऱ्याचा शेवट करीत पत्रकारांशी वार्ता केली. यावेळी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, कुमार आयलानी, संजय केळकर, निरंजन डावखरे, पदाधिकारी शशिकांत कांबळे, जमनू पुरसवानी, प्रकाश माखिजा, राजेश वधाऱ्या, मनोहर खेमचंदानी, भगवान भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

स्मार्ट सिटी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे, यासाठी केंद्राने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मात्र, मागील तीन वर्षात आघाडी सरकारच्या काळात शहराचा विकास रखडला. ही परिस्थिती आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्याने बदलली असून अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. आता बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर माझे लक्ष असून पुढील पाच महिन्यात कल्याण लोकसभेत अनेक दौरे करणार असल्याचे सूचक विधान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in