लाेकल प्रवाशांवर आदळला लोखंडी रॉड; दोन प्रवासी जखमी, तीन कर्मचारी निलंबित

कल्याण-कसारा मार्गावर खर्डी आणि उंबरमाळी स्थानकांदरम्यान धावत्या लोकल ट्रेनवर लोखंडी रॉड आदळल्याने दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
लाेकल प्रवाशांवर आदळला लोखंडी रॉड; दोन प्रवासी जखमी, तीन कर्मचारी निलंबित
लाेकल प्रवाशांवर आदळला लोखंडी रॉड; दोन प्रवासी जखमी, तीन कर्मचारी निलंबित(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : कल्याण-कसारा मार्गावर खर्डी आणि उंबरमाळी स्थानकांदरम्यान धावत्या लोकल ट्रेनवर लोखंडी रॉड आदळल्याने दोन प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

या अपघातात एकनाथ ठोंबरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला मोठी दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून रेल्वेने त्यांना ५० हजारांची रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. दरवाजाजवळ उभे असलेले दुसरे प्रवासी रोहित सरकुटे यांच्या मांडीला जखम झाली असून त्यांना ५ हजारांची मदत देण्यात आली आहे. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च रेल्वे प्रशासन उचलणार आहे.

लाेकल प्रवाशांवर आदळला लोखंडी रॉड; दोन प्रवासी जखमी, तीन कर्मचारी निलंबित
Mumbai : मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल आल्या आमनेसामने; लोकलसेवा विस्कळीत

ही घटना बुधवारी सायंकाळी ४:४५ च्या सुमारास घडली. रेल्वे रुळांलगतच्या उतारावर संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरू असताना तीन मीटर लांबीचा लोखंडी रॉड निसटून धावत्या लोकलवर आदळला. यामुळे उडालेले दगडही प्रवाशांना लागले. मात्र प्राथमिक तपासात हलगर्जीपणा दिसून आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.

या घटनेमुळे उपनगरीय मार्गावरील कामाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या सुरक्षा नियमांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in