Kalyan : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड; ४ जण ताब्यात, Video व्हायरल

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना कल्याण परिसरात घडली आहे.
Kalyan : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड; ४ जण ताब्यात, Video व्हायरल

कल्याण : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना कल्याण परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलीय. राजकीय द्वेशातून ही घटना घडलीय की यामागे अन्य कोणता हेतू आहे, याबाबत अधिकृतपणे माहिती समोर आली नाही. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. तर दोन जण फरार असल्याचं समजतंय.

कल्याण पूर्व भागातील तीसगावमध्ये ही घटना घडली. या परिसरातच गायकवाड यांचं कार्यालय आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिमन्यू गायकवाड यांच्या केबल नेटवर्क कार्यालयाच्या बाहेर पार्क केलेल्या कार जवळ दोन जण फिरत होते. हे लोक चोर असल्याचा संशय कर्मचाऱ्यांना आला. कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले असता त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यांनी फोन करून आपल्या अन्य ४ मित्रांना बोलावले आणि त्यांनी थेट ऑफिसमध्ये घुसून कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

कल्याण पूर्व भागात घडलेल्या या घटनेचं सत्य पोलिसांच्या तपासातून समोर येईल, अशी अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. त्यानंतर महेश यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याप्रकरणी आमदार गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली असून ते तळोजा कारागृहात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in