डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण २०,१८,९५८ मतदार असून यात ७३८ तृतीयपंथी, १०,८०२ दिव्यांग, २२,१७९ नवमतदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत नवमतदार हा महायुतीलाला मतदान करील असा विश्वास शिवसेना (शिंदे गट) युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
कल्याण लोकसभा मतदारसंघ मिळून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व - पश्चिम, डोंबिवली, कळवा, मुंब्रा असे सहा मतदारसंघ आहेत. यात २२,१७९ नवमतदार असून यांचे मत महायुतीलाच मिळतील असे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, २०१४ व २०१९ साली ज्याप्रमाणे निवडणुकीत सामोरे गेलो होतो. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा काय आहे हे सर्वाना माहिती आहे. कुठल्याही उमेदवाराला कमी न लेखत रणनीतीनुसार लोकसभेत काम सुरू आहे. आम्ही केलेल्या कामावर लोकांचा विश्वास आहे. सर्वसमान्यमध्ये जाऊन काम करणारे डॉ. श्रीकांत शिंदे आहे.