कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला लवकरात लवकर गती मिळणार

मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा पूर्ण असलेला मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला लवकरात लवकर गती द्यावी, अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला लवकरात लवकर गती मिळणार
Published on

भिवंडी : मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा पूर्ण असलेला मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला लवकरात लवकर गती द्यावी, अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या भेटीत मुरबाड नवीन रेल्वे मार्ग, कल्याण-असनगाव तिसरी लाइन, कल्याण-कसारा चौथी लाइन आणि कल्याण-बदलापूर तिसरी व चौथी लाइन या दीर्घकालीन प्रलंबित प्रकल्पांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.

दिल्ली येथे खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांची भेट घेत कल्याण-मुरबाड या रखडलेल्या प्रकल्पावर सखोल चर्चा केली. त्यामुळे रखडलेला कल्याण-मुरबाड प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याचे संकेत खासदार बाळ्या मामा यांनी दिले आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड तालुका हा रेल्वेचे जनक नाना शंकर शेठ यांची जन्मभूमी असून मागील ५० वर्षांपासून कल्याण-मुरबाड रेल्वे न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या रखडलेल्या रेल्वे प्रकल्पामुळे मुरबाडचा सर्वांगीण विकास रखडलेला आहे. या भेटीत भिवंडी ते सीएसएमटी लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना वजा विनंती देखील करण्यात आली. या सेवेमुळे भिवंडी परिसरातील लाखो नागरिकांना दररोजच्या प्रवासात मोठा दिलासा मिळेल, तसेच मुंबईशी अधिक सुलभ व वेगवान जोडणी निर्माण होईल. या सर्व प्रकल्पांमुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघासह ठाणे, रायगड आणि पालघर या परिसरातील लाखो नागरिकांना रेल्वेच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. प्रवाशांसाठी अधिक जलद, सुरक्षित आणि दर्जेदार रेल्वे सेवा उपलब्ध होणार असून स्थानिक आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळणार असल्याचे खासदारांनी सांगितले.

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी लवकरात लवकर कल्याण-मुरबाड प्रकल्पातील अडचणी दूर करून हा प्रकल्प लवकरच मार्गी लावला जाईल, असे आश्वासन आपल्याला दिल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.

कल्याण-आंबिवली-मुरबाड प्रकल्प रखडलेला

सन २०२२-२३ मध्ये कल्याण-आंबिवली-मुरबाड या २८ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. मात्र या रेल्वे मार्गाचे केवळ पाच टक्के कामच मार्गी लागले आहे. या रेल्वे मार्गासाठी सर्वात मोठी अडचण असलेले भूमी अधिग्रहण विषय प्रलंबित असून निधी व तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट

भिवंडी : मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा पूर्ण असलेला मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला लवकरात लवकर गती द्यावी, अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या भेटीत मुरबाड नवीन रेल्वे मार्ग, कल्याण-असनगाव तिसरी लाइन, कल्याण-कसारा चौथी लाइन आणि कल्याण-बदलापूर तिसरी व चौथी लाइन या दीर्घकालीन प्रलंबित प्रकल्पांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.

दिल्ली येथे खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव यांची भेट घेत कल्याण-मुरबाड या रखडलेल्या प्रकल्पावर सखोल चर्चा केली. त्यामुळे रखडलेला कल्याण-मुरबाड प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याचे संकेत खासदार बाळ्या मामा यांनी दिले आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड तालुका हा रेल्वेचे जनक नाना शंकर शेठ यांची जन्मभूमी असून मागील ५० वर्षांपासून कल्याण-मुरबाड रेल्वे न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या रखडलेल्या रेल्वे प्रकल्पामुळे मुरबाडचा सर्वांगीण विकास रखडलेला आहे. या भेटीत भिवंडी ते सीएसएमटी लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना वजा विनंती देखील करण्यात आली. या सेवेमुळे भिवंडी परिसरातील लाखो नागरिकांना दररोजच्या प्रवासात मोठा दिलासा मिळेल, तसेच मुंबईशी अधिक सुलभ व वेगवान जोडणी निर्माण होईल. या सर्व प्रकल्पांमुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघासह ठाणे, रायगड आणि पालघर या परिसरातील लाखो नागरिकांना रेल्वेच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. प्रवाशांसाठी अधिक जलद, सुरक्षित आणि दर्जेदार रेल्वे सेवा उपलब्ध होणार असून स्थानिक आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळणार असल्याचे खासदारांनी सांगितले.

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी लवकरात लवकर कल्याण-मुरबाड प्रकल्पातील अडचणी दूर करून हा प्रकल्प लवकरच मार्गी लावला जाईल, असे आश्वासन आपल्याला दिल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in