कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला लवकरात लवकर गती मिळणार; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचे खासदार सुरेश म्हात्रे यांना आश्वासन

कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गातील अडचणी दूर करून हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, या संदर्भात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी संसदेच्या ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी केली होती.
कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला लवकरात लवकर गती मिळणार; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांचे खासदार सुरेश म्हात्रे यांना आश्वासन
Published on

भिवंडी : कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गातील अडचणी दूर करून हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, या संदर्भात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी संसदेच्या ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी केली होती.

खासदार सुरेश म्हात्रे यांच्या मागणीची दखल केंद्रीय रेल्वे व खाद्य प्रसंस्करण उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी घेतली. या रेल्वे प्रकल्पासाठी ८३६.१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून भूमी अधिग्रहण व इतर कामांना लवकरात लवकर प्रारंभ होणार असून या रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागणार असल्याचे लेखी पत्र खासदार बाळ्या मामा यांना पाठवण्यात आले आल्याचे सांगून या प्रकरणी सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in