Kalyan : रेल्वे अधिकाऱ्यांचा प्रमाणिकपणा; रोख रक्कमेसह ४ लाखांचे दागिने केले परत

मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात सापडलेल्या बॅगेत रेल्वे अधिकाऱ्यांना रोख रक्कम आणि दागिने आढळले. अधिकाऱ्यांनी बॅग हरवलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची १२ हजार ६० रुपये रक्कम तसेच अंदाजे ४ लाख रुपये किंमतीचे दागिने परत केले.
Kalyan : रेल्वे अधिकाऱ्यांचा प्रमाणिकपणा; रोख रक्कमेसह ४ लाखांचे दागिने केले परत
Kalyan : रेल्वे अधिकाऱ्यांचा प्रमाणिकपणा; रोख रक्कमेसह ४ लाखांचे दागिने केले परत
Published on

मुंबई : मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात सापडलेल्या बॅगेत रेल्वे अधिकाऱ्यांना रोख रक्कम आणि दागिने आढळले. अधिकाऱ्यांनी बॅग हरवलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची १२ हजार ६० रुपये रक्कम तसेच अंदाजे ४ लाख रुपये किंमतीचे दागिने परत केले.

२२ जानेवारी रोजी मुख्य बुकिंग क्लार्क राहुल कुमार यांना कल्याण येथे कार्यालयाजवळ एक जॅकेट व एक बॅग आढळून आली. त्यांनी तत्काळ कर्तव्यावर असलेले उपस्थानक व्यवस्थापक (वाणिज्य) उमेश विश्वकर्मा यांना याबाबत माहिती दिली. उपस्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात, कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही बॅग उघडण्यात आली असता त्यामध्ये रोख रक्कम १२ हजार ६० रुपये तसेच अंदाजे ४ लाख रुपये किंमतीचे दागिने आढळून आले.

आरपीएफच्या मदतीने संबंधित प्रवाशाचा शोध घेऊन त्यांना कसारा येथून शोधण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in