कल्याण: मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळले; दोन लहान मुलांसह कुटुंबातील चार जण जखमी

घरात कुटुंब झोपले असताना ही घटना घडली. या घटनेत चार जण जखमी झाले. या जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
कल्याण: मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळले; दोन लहान मुलांसह कुटुंबातील चार जण जखमी

डोंबिवली : मुसळधार पावसामुळे कल्याणमधील एका घराचे छत कोसळून कुटुंबातील चार जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. जखमीमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कल्याण पूर्वेतील लोकग्राम न्यू जिम्मी बाग परिसरातील चाळीतील एका घराचे छत कोसळले. घरात कुटुंब झोपले असताना ही घटना घडली. या घटनेत चार जण जखमी झाले. या जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या चारही जणांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवपूजन प्रजापती (२५), प्रिन्स प्रजापती (१३), ललिता प्रजापती (३२), उर्मिला प्रजापती (४५), ज्योती प्रजापती (१६), प्राची प्रजापती (१८) यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in