कल्याण हादरलं ! लिव्ह इन पार्टनरची चाकूने भोकसून हत्या ; पोलिसांकडून आरोपी प्रियकराला अटक

चारित्र्याच्या संशयावरुन ही हत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कल्याण हादरलं ! लिव्ह इन पार्टनरची चाकूने भोकसून हत्या ; पोलिसांकडून आरोपी प्रियकराला अटक

मुंबई शहर तसंच उपनगर आणि ठाणे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर मानली जातात. मात्र, गेल्या काहीन महिन्यांपासून घडणाऱ्या घटना पाहता. मुंबईसह राज्यात महिला अत्याचाराचं प्रणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. काही काही आठवड्यांपूर्वी मुंबईत श्रद्धा वालकरच्या हत्येने खळबळ उडाली होती. यावरुन राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता पुन्हा एकदा एका तरुणीच्या हत्येने खळबळ उडाली आहे.

कल्याणमध्ये पुन्हा एकदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या तरुणीचा बळी गेला आहे. घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रियकराने प्रेयसीची चाकूने हल्ला करत खून केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या प्रकरणातील आरोपी प्रियकराला पोलीसांनी अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन ही हत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर चाकूने वार करत तीची हत्या केली आहे. या घटनेत प्रेयसीच्या जागीच मृत्यू झाला. कल्याण पूर्वच्या वियजनगर येथील आमराई परिसरात ही घटना घडली आहे. रसिका कोळबेकर आणि विजय जाधव हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेची चौकशी करत चारित्र्याच्या संशयावरुन हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या दोघांमध्ये नेहमी भांडण होत असून रागाच्या भरात विजयने सरिसकाच्या खून केला असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. या घटनेमुळे कल्याण शहर हादरले आहे. रसिकाचा राहत्या घरीच हत्या केली आहे. पोलिसांना प्रेयसीचाय मृतदेह ताब्यात घेतला असून पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in