कर्जत : नो एन्ट्रीतून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई; १८,५०० चा दंड वसूल

शहरात नो एन्ट्रीमधून प्रवास करणाऱ्यांवर कर्जत पोलिसांकडून कारवाई दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली असून दोन दिवसात ३७ केसेस दाखल करून १८,५०० रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

कर्जत : नो एन्ट्रीतून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई; १८,५०० चा दंड वसूल
Published on

कर्जत : शहरात नो एन्ट्रीमधून प्रवास करणाऱ्यांवर कर्जत पोलिसांकडून कारवाई दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली असून दोन दिवसात ३७ केसेस दाखल करून १८,५०० रु. दंड वसूल करण्यात आला आहे. कर्जत शहरात होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाययोजना करीत प्रशासनाकडून शहरात मुख्य बाजारपेठेत वन वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

वन वे वाहतूक सुरू केल्यापासून मोठ्या वाहनचालकांची बाजारपेठेत वाहन आणण्याची संख्या कामी झाली असल्याने वाहतूककोंडी होत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही काही दुचाकी वाहनचालक नो एन्ट्रीमधून प्रवास करत आहेत. दोन दिवस कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस हवालदार सुरेश पाटील अणि वाहतूक पोलीस हवालदार बाबसू तिडके यांनी ही धडक कारवाई केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in