धावत्या लोकलमधून महिलेची उडी; पोलीस जवानाने वाचवले प्राण

कर्जत रेल्वे स्थानकावर शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. धावत्या लोकलमधून उडी मारणाऱ्या एका महिलेचे प्राण कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजेंद्र बागुल यांच्या तत्पर आणि धाडसी कृतीमुळे वाचले. प्रसंगावधान राखून त्यांनी महिलेचा जीव गाडीखाली जाण्यापूर्वीच वाचवला.
धावत्या लोकलमधून महिलेची उडी; पोलीस जवानाने वाचवले प्राण
Published on

कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकावर शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. धावत्या लोकलमधून उडी मारणाऱ्या एका महिलेचे प्राण कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजेंद्र बागुल यांच्या तत्पर आणि धाडसी कृतीमुळे वाचले. प्रसंगावधान राखून त्यांनी महिलेचा जीव गाडीखाली जाण्यापूर्वीच वाचवला.

सुनैना अखिलेश यादव (२५) आणि त्यांचे पती अखिलेश यादव (३४, रा. शास्त्रीनगर, खोपोली) हे दुपारी ३.१५ वाजता कर्जत-खोपोली लोकल पकडण्यासाठी कर्जत स्थानकावर आले. दोघेही गाडीत चढले असता, लोकल सुटल्यावर काही कारणास्तव पती अखिलेश यादव स्थानकावर उतरले आणि गाडी वेगाने निघाली. हे लक्षात येताच सुनैना यांनी कोणताही विचार न करता धावत्या गाडीतून उडी मारली. ही धोकादायक घटना रेल्वे स्थानकावर तैनात असलेले गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र बागुल यांनी पाहिली आणि क्षणाचाही विलंब न करता धाव घेत सुनैना यांना स्थानकावर सुरक्षित खेचले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

या घटनेत संबंधित महिला किरकोळ जखमी झाली असून तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात यासंबंधी नोंद करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in