सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

कर्जत तालुक्यातील टेंभरे येथील रिवाईल्ड सेंच्युरी अँड चॅरिटेबल ट्रस्टमधून सव्वाअकरा लाख रुपये किमतीचे परदेशी पक्षी चोरून नेणाऱ्या टोळीचा शोध कर्जत पोलिसांनी परराज्यात जाऊन लावला. चेन्नईत दोन आरोपींना अटक करून सर्व मौल्यवान पक्षी ताब्यात घेतले गेले. रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या कामगिरीबद्दल कर्जत पोलिसांचे अभिनंदन केले.
सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
Published on

कर्जत : कर्जत तालुक्यातील टेंभरे येथील रिवाईल्ड सेंच्युरी अँड चॅरिटेबल ट्रस्ट मधून परदेशी प्रजातीचे सुमारे सव्वाअकरा लाख रुपये किमतीचे पक्षी चोरून नेणाऱ्या टोळीचा छडा कर्जत पोलिसांनी परराज्यात जाऊन लावला. चेन्नई (तमिळनाडू) येथे दोन आरोपींना अटक करून सर्व मौल्यवान पक्षी ताब्यात घेण्यात आले. या कामगिरीबद्दल रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी कर्जत पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.

ट्रस्टमधील लोखंडी पिंजऱ्याचा दरवाजा फोडून सात आफ्रिकन ग्रे पॅरट (प्रत्येकी किमत ७५,०००), एक ब्लू गोल्ड मकाव (किमत २,००,०००) आणि एक स्कार्लेट मकाव (किमत ४,००,०००) असा एकूण सव्वाअकरा लाखांचा मुद्देमाल १९ सप्टेंबरला चोरीस गेला होता.

फिर्यादीनंतर पोलीस अधीक्षक दलाल, अप्पर अधीक्षक अभिजीत शिवतारे, उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या पथकाने तपास सुरू केला. या प्रकरणी चेन्नई येथे सापळा रचून अनिल रामचंद्र जाधव (१९) आणि राजेशसिंग माही उर्फ समशेरसिंग (४३) या आरोपींना अटक केली.

पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक

या दुर्मिळ पक्ष्यांविषयी तज्ज्ञांनी सांगितले की आफ्रिकन ग्रे पॅरट पाच वर्षांच्या मुलाइतकी बुद्धिमत्ता असलेले, संवाद साधणारे व सुमारे ४० वर्षे आयुष्य असतात. तर ब्लू गोल्ड मकाव आणि स्कार्लेट मकाव हे पक्षी ६०-७० वर्षे जगतात व उत्कृष्ट नक्कल करण्याची क्षमता असते. कर्जत पोलिसांच्या या प्रशंसनीय कामगिरीमुळे दुर्मिळ आणि मौल्यवान पक्षी सुरक्षित परत मिळाले असून, स्थानिक पातळीवर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in