Karjat : शाळेच्या बसमध्ये पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार

कर्जत तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणाऱ्या पाच वर्षांच्या दोन मुलींवर शाळेच्या बसमध्ये बसच्या क्लीनरनेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
Karjat : शाळेच्या बसमध्ये पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार
Published on

कर्जत : कर्जत तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणाऱ्या पाच वर्षांच्या दोन मुलींवर शाळेच्या बसमध्ये बसच्या क्लीनरनेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी चोवीस वर्षीय नराधमाला पोलिसांनी तत्काळ अटक केली असून बस देखील जप्त केली आहे.

याबाबत पीडित मुलींनी त्यांच्या पालकांना सांगितले की, स्कूल बसमधील क्लीनर करण दीपक पाटील (२४) हा या दोन मुलींना ड्रायव्हरच्या मागील सीटवर बसायला सांगत असे. त्यानंतर त्यांना मांडीवर बसवून अश्लील स्पर्श करत असे तसेच जर मांडीवर बसण्यास नकार दिल्यास मारहाण देखील करत असल्याची तक्रार मुलींना पालकांकडे केली. हा प्रकार गेली वर्षभर सुरू असल्याचे पालकांनी सांगितले. या घटनेमुळे पालकांमध्ये संताप निर्माण झाला असून 'शाळेची बस खरच सुरक्षित आहे का? ' असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकरणाची गंभीर बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलींच्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडित मुलींच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. पालकांवर दबाव आणण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या सरपंचाकडून प्रयत्न केल्याचा आरोप खुद्द पीडित मुलींच्या पालकांकडून केला गेला गेला आहे. मात्र यावर आता कर्जत मनसेकडून तसेच भाजप पक्षाकडून या प्रकरणात सखोल चौकशी

करून हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येऊन नराधमास फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in