Karjat : रेल्वे विश्रामगृहातील आऊट हाऊसमध्ये युवकाचा खून

कर्जत : माथेरान नगरपालिका हद्दीमधील रेल्वे अधिकारी विश्राम गृहातील आऊट हाऊसमध्ये एक इसम अर्धमेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या युवकाचा खून झाल्याच्या संशयावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
Karjat : रेल्वे विश्रामगृहातील आऊट हाऊसमध्ये युवकाचा खून
Published on

कर्जत : माथेरान नगरपालिका हद्दीमधील रेल्वे अधिकारी विश्राम गृहातील आऊट हाऊसमध्ये एक इसम अर्धमेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या युवकाचा खून झाल्याच्या संशयावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक युवक संशयास्पद अर्ध मेलेल्या अवस्थेत असल्याचे माथेरान पोलिसांना माहिती मिळाली. हे कळताच माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर सुशांत गजगे हा युवक अर्धमेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्याला तात्काळ माथेरान येथील बि. जे. दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली मिसाळ यांनी सुशांत हा मृत झाल्याचे सांगितले.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रेल्वे विश्राम गृहात सुशांतसोबत काम करत असलेल्या स्वयंपाकी तसेच हेल्पर या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने अधिक तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in