केडीएमसी आयुक्तांनी घेतली अनुउपस्थितीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती

कामात हलगर्जी करण्या-या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश परिमंडळ-१ चे उपआयुक्त धैर्यशील जाधव यांना दिले
केडीएमसी आयुक्तांनी घेतली अनुउपस्थितीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती

केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी कल्याण पश्चिमेतील हजेरी शेडला भेट देत कामचुकार, सतत अनुउपस्थितीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत कारवाईचे निर्देश दिल्याने कामचुकार, दाडी बहादर कर्मचाऱ्यांची आता खैर नाही.

केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बुधवारी सकाळी कल्याणमधील स्वानंद नगर हजेरी शेड, पारनाका हजेरी शेड, सुभाष मैदान हजेरी शेड येथे अचानक पाहणी करुन तेथील एकंदर कामकाजाचा, उपस्थित कर्मचारी वर्गाबाबतचा आढावा घेतला व अनुपस्थित आणि कामात हलगर्जी करण्या-या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश परिमंडळ-१ चे उपआयुक्त धैर्यशील जाधव यांना दिले. याच वेळी त्यांनी परिवहन गणेश घाटला भेट देवून तेथील बसेसची पाहणी देखील केली.

कल्याण पश्चिम येथील शिंदे मळा परिसर आणि सुभाष मैदान हजेरी शेडच्या आजूबाजूला असलेली अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि सर्व परिसरात स्वच्छता राखणेबाबत संबंधित अधिका-यांना निर्देश दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in