KDMC : हर्षाली चौधरी कुंभेश्वर देवदर्शनाला; महापौरपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी देवाकडे प्रार्थना

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी ३ फेब्रुवारी रोजी विराजमान होणाऱ्या शिंदेसेनेच्या हर्षाली चौधरी यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी कुंभेश्वर देवाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. शनिवारी भिवंडी तालुक्यातील त्यांच्या माहेरी असलेल्या शेरे गावाजवळ, पडघा–खडवली फाट्याजवळील कुंभेश्वर मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. आगामी कार्यकाळ यशस्वी होण्यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली.
हर्षाली चौधरी कुंभेश्वर देवदर्शनाला; महापौरपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी देवाकडे प्रार्थना
हर्षाली चौधरी कुंभेश्वर देवदर्शनाला; महापौरपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी देवाकडे प्रार्थना
Published on

भिवंडी : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी ३ फेब्रुवारी रोजी विराजमान होणाऱ्या शिंदेसेनेच्या हर्षाली चौधरी यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी कुंभेश्वर देवाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. शनिवारी भिवंडी तालुक्यातील त्यांच्या माहेरी असलेल्या शेरे गावाजवळ, पडघा–खडवली फाट्याजवळील कुंभेश्वर मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. आगामी कार्यकाळ यशस्वी होण्यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली.

यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार शांताराम मोरे म्हणाले, कल्याण-डोंबिवलीसारख्या विकसित शहराच्या महापौरपदी आमच्या पडघा परिसरातील महिलेला संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. यावेळी शिंदेसेनेचे भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे आमदार शांताराम मोरे, सरपंच सायली पाटील तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी हर्षाली चौधरी यांना महापौरपदासाठी शुभेच्छा दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in