शहरातील वाहतूककोंडी टाळण्याचे नागरिकांना आवाहन; केडीएमसी, एमएसआरडीसी व शहर वाहतूक शाखा अधिकाऱ्याची संयुक्त पाहणी

पत्रीपुलाच्या उतारावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने पावसाळ्यापूर्वी पुढील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत काँक्रीटीकरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी एमएसआरडीसीकडून देण्यात आली. तसेच येथील प्रचंड रहदारीमुळे फक्त रात्री १२.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत काम करण्यास अनुमती असल्याने कामाचा वेग ठेवण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील वाहतूककोंडी टाळण्याचे नागरिकांना आवाहन; केडीएमसी, एमएसआरडीसी व शहर वाहतूक शाखा अधिकाऱ्याची संयुक्त पाहणी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा कल्याण शिळ रस्ता हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारित आहे. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम एमएसआरडीसीमार्फत सुरू असून यातील कल्याण येथील पत्रीपुलाला जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांचे काम नुकतेच एमएसआरडीसीने सुरू केले आहे. या कामामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याबाबत तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्याने याबाबतीत सर्व संबंधितांसोबत संयुक्त पाहणी करून उपाययोजना करण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी निर्देश दिल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिका, एमएसआरडीसी व शहर वाहतूक शाखा अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली.

एमएसआरडीसीमार्फत कल्याण शहरातील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे बहुतांश काम झालेले असून ज्या भागातील रस्त्याची कामे अपूर्ण आहेत, ती हाती घेण्यात आलेली आहेत. पत्रीपुलाच्या उतारावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने पावसाळ्यापूर्वी पुढील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत काँक्रीटीकरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी एमएसआरडीसीकडून देण्यात आली. तसेच येथील प्रचंड रहदारीमुळे फक्त रात्री १२.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत काम करण्यास अनुमती असल्याने कामाचा वेग ठेवण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रॅफिक वॉर्डनची मदत घेणार

पाहणीदरम्यान झालेल्या चर्चेनुसार या ठिकाणी एकूण चार मार्गांचे काम सुरू असून पहिला मार्ग अंतिम टप्प्यात आहे, तसेच उरलेल्या तीन मार्गांची कामे ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अभियंता व ठेकेदार यांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कामाचा वेग तातडीने वाढविणे, कामासाठी रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत एमएसआरडीसीला अनुमती देणे व वाहतूककोंडीचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने वाढीव १५ ते २० ट्रॅफिक वॉर्डन शहर वाहतूक शाखेत उपलब्ध करण्याबाबत सूचना महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी संबंधिताना दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in