KDMC मध्ये शिवसेनेचा महापौर, तर उपमहापौरपद भाजपकडे; शिवसेनेच्या हर्षाली चौधरी, भाजपच्या राहुल दामलेंचा उमेदवारी अर्ज दाखल

कल्याण - डोंबिवली मनपाच्या महापौरपदासाठी शिवसेना नगरसेविका हर्षाली चौधरी-थवील यांनी, तर उपमहापौरपदाकरिता भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज पालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे दाखल केला.
KDMC मध्ये शिवसेनेचा महापौर, तर उपमहापौरपद भाजपकडे; शिवसेनेच्या हर्षाली चौधरी, भाजपच्या राहुल दामलेंचा उमेदवारी अर्ज दाखल
Photo : X (@DrSEShinde)
Published on

डोंबिवली : कल्याण - डोंबिवली मनपाच्या महापौरपदासाठी शिवसेना नगरसेविका हर्षाली चौधरी-थवील यांनी, तर उपमहापौरपदाकरिता भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज पालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे दाखल केला. यावेळी शिवसेना कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार राजेश मोरे, मनसे नेते प्रमोद ( राजू ) पाटील, भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आज लाडक्या बहीणीने उमेदवारी अर्ज भरला आहे .लाडक्या बहिणीचा सन्मान सर्व नेत्यांनी केला आहे. महापौर बनल्यानंतर लाडकी बहीण पालिकेचा कारभार करणार आहे, त्यामुळे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे. त्याचबरोबर भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांना उपमहापौरपदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. हे दोघेही मिळून पालिकेचा कारभार करतील, अधिकाधिक विकास करतील. महायुतीच्या विजयाकरता प्रत्येक कार्यकर्ता लढाला. लोकांचा विश्वस महायुतीवर आहे. म्हणूनच आज महायुतीचे चित्र दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in