आपला होतो खेळ, ‘पशू-पक्ष्यांचा जातो जीव’; ‘पॉज’ संस्थेला मदतीचे फोन

दरवर्षी संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. मात्र, पतंगप्रेमींच्या हौशीसाठी वापरला जाणाऱ्या नायलॉन आणि चायनीज मांजामुळे पक्ष्यांचा नाहक बळी जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पॉज’ संस्थेकडे पक्षी मांजात अडकल्याचे अनेक फोन आले आले.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

डोंबिवली : दरवर्षी संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. मात्र, पतंगप्रेमींच्या हौशीसाठी वापरला जाणाऱ्या नायलॉन आणि चायनीज मांजामुळे पक्ष्यांचा नाहक बळी जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पॉज’ संस्थेकडे पक्षी मांजात अडकल्याचे अनेक फोन आले आले.

मकर संक्रांतीच्या काळात पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार मांजामुळे (विशेषतः चायनीज मांजा) हजारो पक्षी जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो, कारण मांजा त्यांच्या शरीराला, पंखांना किंवा गळ्याला अडकतो, ज्यामुळे त्यांना उडणे शक्य होत नाही आणि ते मरतात. या त्रासाला ‘पक्षी त्रास’ म्हणतात, ज्यासाठी जनजागृती आणि मांजावर बंदी घालण्याची मागणी केली जाते.

पक्ष्यांच्या त्रासाची कारणे :

  • धारदार मांजा: काचेचा लेप असलेला मांजा पक्ष्यांच्या त्वचेत घुसतो आणि पंखांमध्ये अडकतो, ज्यामुळे त्यांना गंभीर इजा होते.

  • गळ्याला अडकणे: मांजा गळ्याभोवती गुंडाळल्याने पक्षी श्वास घेऊ शकत नाहीत आणि त्यांना अन्नही मिळत नाही.

  • विद्युत तारांना अडकणे: अनेकदा मांजा विजेच्या तारांमध्ये अडकतो आणि पक्षी तिथे अडकून जखमी होतात.

  • पक्षी बचाव मोहीम: अनेक संस्था मकर संक्रांतीनंतर जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी मदत शिबिरे आयोजित करतात.

‘पॉज’ संस्थेचे निलेश भणगे यांच्या मते

नैसर्गिक मांजा वापरा: शक्य असल्यास कापडी किंवा नैसर्गिक धाग्यांचा मांजा वापरा, जो कमी धोकादायक असतो.

चायनीज मांजा टाळा: नायलॉन आणि काचेचा लेप असलेला मांजा वापरू नका, कारण तो पक्षांसाठी प्राणघातक असतो.

जनजागृती: मकर संक्रांतीच्या दिवशी पक्ष्यांना होणाऱ्या त्रासाविषयी इतरांना माहिती द्या.

जखमी पक्ष्यांना मदत: जखमी पक्षी दिसल्यास त्वरित वन्यजीव बचाव संस्थांना किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवा, संस्थेच्या ९८२०१६१११४ हेल्पलाइनला कळवा.

मांजा पूर्ण पणे बंद करावा आणि या पक्षांचं प्राण वाचवावे असेच पक्षी उपचार केंद्रातील लोकांचे म्हणणे आहे. एकीकडे या मांजामुळे माणसांना इजा होते. तर या पक्षांचा या मांज्यामुळे जीव जातो, असे ‘पॉज’ संस्थेच्या अनुराधा रामस्वामी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in