परीक्षेत उत्तरे दाखवण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

शांतीनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये हल्लेखोर आरोपी खालिद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.
परीक्षेत उत्तरे दाखवण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला

भिवंडी : शहरात दोन धक्कादायक घटनांपैकी पहिल्या घटनेत १०वीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर महाविद्यालयासमोरच तीन विद्यार्थ्यांनी चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या जखमी विद्यार्थ्याने १० वीची परीक्षा सुरू असताना वर्गात आरोपी विद्यार्थ्याला प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिल्याच्या वादातून भर रस्त्यात चाकूने भोसकले. हल्लेखोर विद्यार्थ्यांसह ३ हल्लेखोर फरार झाले, तर दुसऱ्या घटनेत न्यायालयात केलेला दावा मागे घेण्यासाठी एका शिक्षिकेला भररस्त्यात बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या दोन्ही घटनांमुळे विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे. या दोन्ही घटनांची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत १० वीच्या वर्गात शिक्षण घेणारा आसिफ साजिद शेख हा विद्यार्थी भिवंडी शहरातील भोईवाडा भागात असलेल्या एका इमारतीत कुटूंबासह राहतो. जखमी आसिफ याची नुकतीच १० वीची परीक्षा संपली असून, तो २६ मार्च रोजी परीक्षा केंद्रातील वर्गात पेपर लिहीत असताना एका हल्लेखोर विद्यार्थ्याने आसिफकडे प्रश्नाचे उत्तर देण्याचा तगादा लावला होता; मात्र जखमी आसिफने वर्गात परीक्षा सुरू असल्याने त्याने प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. याच वादातून हल्लेखोर विद्यार्थी रेहानला राग आला. त्यानंतर परीक्षा संपल्यावर दुपारी हल्लेखोर रेहान, शाहिद व त्यांचा एक मित्र असे तिघांनी आसीफला हाताच्या ठोश्याबुक्क्यांसह चाकूहल्ला करून त्यास गंभीर जखमी केले आहे, तर या चाकू हल्ल्यात आसिफचा मोबाईलही गहाळ झाला आहे.

शिक्षिकेवरही भर रस्त्यात हल्ला

दुसऱ्या घटनेत ताहिरा शेख (२८) या पेशाने शिक्षिका असून, त्या भिवंडी शहरातील नदीनाका परिसरात कुटूंबासह राहतात. त्या कुटूंबाच्या उपजीवेसाठी खासगी शिकवणी वर्ग चालवीत आहेत. २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास खासगी ट्युशनची शिकवणी घेण्यासाठी शिक्षिका ताहिरा अब्दुल नबी शेख ह्या भिवंडीतील फंडोलेनगर येथे जात होत्या. त्याच सुमाराला भिवंडीतील पिराणी पाड्यात राहणारा खालिद हिबादुल्लाह अन्सारी याच्याविरोधात शिक्षिका ताहीराने न्यायायालयात दावा दाखल केला आहे. तो दावा मागे घेण्यासाठी आरोपी खालिदने २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास अशोकनगर भागातील भर रस्त्यात ताहिरा यांना गाठून त्यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आहे. या घटनेप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये हल्लेखोर आरोपी खालिद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in