समर शॉपिंग फेस्ट, गावरान सुगरणींच्या फूड फेस्टची मेजवानी; ठाण्यात कोकण बाजाराचे आयोजन

उन्हाळ्याच्या सुट्टीत खवय्यांना आणि खरेदीप्रेमींसाठी एक खास पर्वणी घेऊन कोकण बाजार ठाणेकरांच्या भेटीला येत आहे.
समर शॉपिंग फेस्ट, गावरान सुगरणींच्या फूड फेस्टची मेजवानी; ठाण्यात कोकण बाजाराचे आयोजन
Published on

ठाणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत खवय्यांना आणि खरेदीप्रेमींसाठी एक खास पर्वणी घेऊन कोकण बाजार ठाणेकरांच्या भेटीला येत आहे. याच माध्यमातून “समर शॉपिंग फेस्ट आणि गावरान सुगरणींचा फूड फेस्ट”चे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. दोन दिवसीय या फूड फेस्टमध्ये विविध प्रकारच्या शॉपिंग आणि खाद्ययात्रेचा संगम अनुभवता येणार आहे. त्यामुळे खवय्यांसाठी गावरान चव आणि खरेदीप्रेमींसाठी एक आगळावेगळी मेजवानी असणार आहे.

मराठी उद्योजकांचा उत्सव असणाऱ्या या फूड फेस्टचे आयोजन २६ आणि २७ एप्रिल रोजी समारोह बॅन्क्वेट, सीकेपी हॉल, ठाणे (प.) येथे हे भव्य प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत करण्यात आले आहे, जिथे खवय्यांसाठी गावरान चव आणि खरेदीप्रेमींसाठी खास मराठी उत्पादनांचा खजिना उपलब्ध असणार आहे.

या प्रदर्शनात सहभागी होणारे सर्व उत्पादक हे शंभर टक्के मराठी उद्योजक आहेत, जे स्वतःहून उत्पादने निर्माण करतात, गुणवत्ता जपत ग्राहकांपर्यंत पोहोचतात आणि आपल्या उद्योगातून समाजात सकारात्मक बदल घडवतात.

दोन अनुभव - एकाच ठिकाणी समर शॉपिंग फेस्ट

कोकणी हापूस आंबा, फणस, सुकट, कोकम सरबत, मसाले, लोणची हर्बल साबण, कोल्ड प्रेस्ड तेल, घरगुती सौंदर्यप्रसाधने हस्तकला, पारंपरिक वस्त्रप्रावरणे, हँडमेड उत्पादने

गावरान सुगरणींचा फूड फेस्ट

मालवणी थाळी, झणझणीत भाजी-भाकरी उकडीचे मोदक, मसाले भात, घरगुती चविष्ट पदार्थ गावाकडच्या पारंपरिक चवींनी भरलेले पदार्थ, खास सुगरणींकडून

विक्रीसाठी एक हक्काचे प्लॅटफॉर्म

या फूड फेस्टच्या माध्यमातून कोकण बाजारचा ठसा ठाण्यात उमटविण्याचा मानस आयोजकांचा आहे. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ८० यशस्वी प्रदर्शन करण्यात आले आहे. तसेच या फेस्टच्या माध्यमातून ५५०+ मराठी लघुउद्योजकांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर या फूड फेस्टवर १ लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास दर्शविला असून ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीसाठी एक हक्काचे प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे.

का यावे कोकण बाजारात?

- स्थानिक उत्पादकांना थेट पाठिंबा

- गावरान खाद्यपदार्थांचा झणझणीत अनुभव

- पारंपरिकतेचा आणि गुणवत्तेचा संगम

- संपूर्ण कुटुंबासाठी आठवणीत ठेवावा असा अनुभव

- गावरान चव अनुभवाचे आणि मराठी उद्योजकांना आपला पाठिंबा दर्शवा!

logo
marathi.freepressjournal.in