Kalyan: परिस्थितीशी लढणाऱ्या मायलेकी; ३ वर्षांच्या मुलीसोबत ऑटो चालवणारी कोमल गायकवाड

दररोज सकाळी जेव्हा बहुतांश मुले अजून गाढ झोपेत असतात, तेव्हा कोमल गायकवाड आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन रिक्षा चालवण्यासाठी घराबाहेर पडतात. आधीपासूनच त्यांना ऑटो चालवता येत असल्याने त्यांनी सुरुवातीला भाड्याने ऑटो घेऊन काम सुरू केले.
परिस्थितीशी लढणाऱ्या मायलेकी; ३ वर्षांच्या मुलीसोबत ऑटो चालवणारी कोमल गायकवाड
परिस्थितीशी लढणाऱ्या मायलेकी; ३ वर्षांच्या मुलीसोबत ऑटो चालवणारी कोमल गायकवाड
Published on

शंकर जाधव/ कल्याण

आई आपल्या मुलासाठी कोणत्याही संकटाला सामोरी जाते, याचे जिवंत उदाहरण कल्याण शहरात पाहायला मिळत आहे. तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीसोबत दररोज ऑटो रिक्षा चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कोमल गायकवाड या आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. बिकट आर्थिक परिस्थितीतही हार न मानता त्यांनी जिद्दीने उभे राहण्याचा मार्ग निवडला आहे.

दररोज सकाळी जेव्हा बहुतांश मुले अजून गाढ झोपेत असतात, तेव्हा कोमल गायकवाड आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन रिक्षा चालवण्यासाठी घराबाहेर पडतात. आधीपासूनच त्यांना ऑटो चालवता येत असल्याने त्यांनी सुरुवातीला भाड्याने ऑटो घेऊन काम सुरू केले.

लहान मुलीसोबत काम करणे हे सुरुवातीला मोठे आव्हान होते. सुरुवातीला त्यांनी ऑटोच्या मागील बाजूस मुलीसाठी छोटासा बिछाना तयार केला होता. मात्र प्रवासी बसल्यानंतर मुलगी घाबरून रडू लागायची. त्यामुळे नंतर त्यांनी ऑटोमध्ये आपल्या शेजारीच मुलीसाठी छोटी सीट बसवून घेतली. त्या सीटवर तिची मुलगी तेजू आरामात बसू लागली आणि आईसोबतच प्रवास करू लागली.

दररोज रिक्षा चालवून कोमल साधारण ४०० ते ५०० रुपये कमवत होत्या. त्या उत्पन्नातून खर्च भागवणे सोपे नव्हते. तरीही त्यांनी थोडीथोडी बचत करत अखेर पाच महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतःची रिक्षा खरेदी करून आपले स्वप्न पूर्ण केले.

महिलांसाठी प्रेरणादायी

कोमल गायकवाड यांची ही कहाणी केवळ संघर्षाची नाही, तर आईच्या अटळ जिद्दीची आणि मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची आहे. कठीण परिस्थिती असूनही त्यांनी हार न मानता मेहनतीच्या बळावर स्वतःचा मार्ग तयार केला आहे. त्यामुळेच त्यांचा हा संघर्ष आज अनेक महिलांसाठी आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

logo
marathi.freepressjournal.in