रात्री घराबाहेर लघूशंकेसाठी आले, तितक्यात बिबट्याने केला प्राणघातक हल्ला; मोखाड्यात वयोवृद्ध गंभीर जखमी

मिरके हे रात्री १ वाजेच्या सुमारास लघवी करण्यासाठी घराबाहेर आले व बसून लघवी करत असतांना बाजूलाच...
रात्री घराबाहेर लघूशंकेसाठी आले, तितक्यात बिबट्याने केला प्राणघातक हल्ला; मोखाड्यात वयोवृद्ध गंभीर जखमी
(संग्रहित छायाचित्र)

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील मौजे करोळ पैकी वावळ्याचीवाडी येथील बच्चू जिवा मिरके (८०) यांना राहत्या घराजवळ दिंनाक १४ फेब्रुवारी रोजी रात्री साधारण १ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला आहे. मिरके यांना मोठ्या प्रमाणात जखमी केले आहे.

येथील गावकऱ्यांनी तातडीने त्यांना मध्यरात्री मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी एकनाथ चौधरी यांनाही त्याबाबत कल्पना दिली असून वनपरिक्षेत्र अधिकारी व इतर कर्मचारी यांनीही मिरके यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करुन स्थळ पंचनामा वगैरे कायदेशीर बाबींची पूर्तता केली असून जबाब पंचनामा वरिष्ठ कार्यालयास पाठवणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे. दरम्यान वावळ्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून व वनविभागाने सांगितलेली वस्तूस्थिती अशी की, मिरके हे रात्री १ वाजेच्या सुमारास लघवी करण्यासाठी घराबाहेर आले व बसून लघवी करत असतांना बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. याच त्यांच्या वरच्या ओठाला आणि कपाळावर गंभीर जखम झालेली आहे. मिरके यांचे ओरडने ऐकून घरातील माणसे बाहेर आले असता अंगावर ठिपके असलेली आकृती पाहताना आढळली असल्याने तो बिबट्याच असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in