
शहापूर : शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीतील गुंडे, डेहणे, पाचघर या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. स्थानिक वनपाल यांना गेल्या दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्याचे हे फोटो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. यासाठी डोळखांब वन विभागामार्फत ठिकठिकाणी सावधानतेचे फलक लावण्यात आले आहेत.
बिबट्याचा हल्ला होऊ नये, यासाठी नागरिकांना काळजी घेण्याच्या आव्हान करण्यात येत आहे. डोळखांब परिसर हा घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे.
गुंडे, डेहणे, पाचघर या ठिकाणी बिबट्याचा वावर नेहमीच असतो. मात्र आता जंगले कमी झाल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे आपले भक्ष्य शोधण्यासाठी येत असतात. बिबट्याच्या हल्ल्यापासून सावध करण्यासाठी डोळखांब वनविभागाने मोहीम हाती घेतली आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.