जव्हार तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घरांची भिंत पडुन सिमेंटचे पञे फुटल्याने घरातील साठवलेले धान्य भिजुन कुटुंबाचे नुकसान झाले आहे.
जव्हार तालुक्यात संततधार पावसामुळे  जनजीवन विस्कळीत

मध्यंतरी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. त्यामुळे सर्व सामान्यांना थोडा दिलासा मिळाला होता. परंतु शनिवार पासुन पुन्हा सुरु झालेल्या संततधार पावसाने सर्वत्र दैना उडवली आहे, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर काहींचे संसार उघड्यावर पडले आहेत.

जव्हार तालुक्यातील कासटवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गरदवाडी गावठाण मधील महिला गंगू शंकर सांबरे (वय ४८) या महिलेच्या घरांची भिंत पडुन सिमेंटचे पञे फुटल्याने घरातील साठवलेले धान्य भिजुन कुटुंबाचे नुकसान झाले आहे. महिलेची आधीच हलाखीची परिस्थिती असताना पावसाने झालेल्या नुकसानीमुळे संसार उघड्यावर आला हे. हि महिला विधवा असून तिची मुलगी, आणि तिच्या आई यांचा सांभाळ करते. परंतु, पावसाने तिचे कुटुंब उघड्यावर आणले आहे.

शिवाय, कोरतड ग्रामपंचायतमधील डुंगाणी येथील चिंतामण गोपाळ चौधरी याचे शनिवारी झालेल्या पावसाने घराची भिंत ,छप्पर राञी १.३० च्या सुमारास पडून घराचे नुकसान झाले आहे.त्यात भिंत व कौले फुटुन नुकसान झाले. माञ जिवितहानी टळली आहे.अतिवृष्टीमुळे घरांच्या झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करुन नुकसान ग्रस्तांनी मदतीची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in