पुष्पा स्टाइलने दारूची तस्करी; सिमेंट मिक्सरमधून बनावट दारूचा सप्लाय; ६६ लाखांची दारू जप्त

गोवा राज्यात बनावट दारू निर्माण करून विक्रीसाठी राज्यात आणली जात होती. यासाठी चक्क सिमेंट मिक्सरचा वापर करण्यात आला होता.
पुष्पा स्टाइलने दारूची तस्करी; सिमेंट मिक्सरमधून बनावट दारूचा सप्लाय; ६६ लाखांची दारू जप्त
एक्स @Rajmajiofficial
Published on

ठाणे : गोवा राज्यात बनावट दारू निर्माण करून विक्रीसाठी राज्यात आणली जात होती. यासाठी चक्क सिमेंट मिक्सरचा वापर करण्यात आला होता. ठाण्यात पुष्पा स्टाइलने करण्यात येणारे दारूची तस्करी उघडकीस आणली असून एका सिमेंट मिक्सरसह ६६ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भरारी पथकाने केली आहे. ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याचे समजले.

त्यानुसार सीबीडी डी. वाय. पाटीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर घाटामध्ये दारूबंदी करण्यासाठी ग्रस्त घालत असताना पांढऱ्या रंगाचा दहाचाकी सिमेंट मिक्सर या वाहनावर संशय आला. सदर वाहनास थांबवून तपासणी केली असता वरती काहीच आढळून आले नाही. मात्र वाहनाच्या मधील बाजूस असलेल्या सिमेंट मिक्सरचे झाकण उघडून आतमध्ये तपासणी केली असता यामध्ये दारूचे बॉक्स आढळून आले. मिक्सरमध्ये लपवून ठेवलेले गोवा राज्यातील बनावट विदेशी मद्याचे ५९५ बॉक्स आढळून आले. ज्याची साधारण किंमत ६६ लाख ३९ हजार इतकी आहे. पथकाने दारूच्या बॉक्ससह सिमेंट मिक्सर ट्रक देखील जप्त केला आहे. ट्रकचालकाला अटक ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आज गस्त सुरू असतानाच नवी मुंबईमधील बेलापूर या ठिकाणी सापळा रचून सदर कारवाई केली आहे.

याप्रकरणी मिक्सर चालक मोहन जोशी याला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एम. पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एन. आर. महाले, दुय्यम निरीक्षक एस. आर. मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी. जी. थोरात आदींनी केली.

logo
marathi.freepressjournal.in