डम्पिंगच्या त्रासाला कंटाळून डायघर ग्रामस्थांचा निवडणुकांवर बहिष्कार!

सदर डम्पिंगवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया ही योग्य प्रकारे होत नाही तसेच ठाणे मनपाकडून मोठ्या प्रमाणात ओला कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ व येथे आजूबाजूला जे नव्याने वसलेले रहिवासी इमारती आहेत.
डम्पिंगच्या त्रासाला कंटाळून डायघर ग्रामस्थांचा निवडणुकांवर बहिष्कार!

ठाणे : महापालिका प्रशासनाने डायघर येथे बेकायदेशीरपणे कचरा टाकण्यासाठी डम्पिंग तयार केल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. बळजबरीने डायघरवासीयांवर हे डम्पिंग लादलेले असून नागरिकांनी अनेक ठिकाणी तक्रार देऊन सुद्धा त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी शासन, प्रशासन किंवा राजकीय नेते जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याचा स्थानिकांनी आरोप करत आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे.

प्रकरणी ग्रामस्थांनी संबधित स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक व पालक मंत्री आणि विशेष करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्यासमवेत सर्वांना रीतसर पत्रव्यवहार करून त्यांना न्याय मिळण्यासाठी खूप वेळा त्यांची भेट घेऊन चर्चा केली असता अद्याप या नागरिकांना अजूनपर्यंत कुठलाही नेता किंवा प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही. ज्यांना जनकल्याणासाठी जनतेने निवडून दिले ते जनसेवक आज अशाप्रकारे त्याच जनतेवर अन्याय करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सदर डम्पिंगवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया ही योग्य प्रकारे होत नाही तसेच ठाणे मनपाकडून मोठ्या प्रमाणात ओला कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ व येथे आजूबाजूला जे नव्याने वसलेले रहिवासी इमारती आहेत ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक राहत असून लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, तरुण या सर्वांना मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारपणाने त्रस्त झालेले आहे, एकीकडे स्वच्छतेवर करोड रुपये खर्च केला जातो आणि दुसरीकडे नागरिकांना अस्वच्छतेमुळे आजाराला सामोरे जावे लागते ही तर जीव घेणारी स्वच्छता आहे की काय..? असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला डम्पिंग जोपर्यंत लोकवस्ती मधून हटत नाही, तोपर्यंत आमच्याकडून निवडणूकांवर बहिष्कार कायम असेल ही भूमिका घेत स्थानिक ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.

आमच्याकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. संबंधित जितक्या सरकारी संस्था आहेत त्या सर्वांना कळवूनसुद्धा अधिकारी वर्गाने आम्हाला न्याय दिला नाही. त्यामुळे सर्वांनी एकजूट होऊन निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, भविष्यात डम्पिंग हटवले नाहीतर जवळपास लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.

- संतोष पाटील

आम्ही महाराष्ट्र प्रदूषण विभागाकडे रितसर तक्रार दिली असून संबंधित विषय गंभीरपणे घेत आहोत त्यासाठी स्वतःमाझा मुलगा न्यायालय प्रक्रियामध्ये सहभाग होऊन डम्पिंगविरोधात सर्व कागदपत्रे जमा करून कसे न्याय मिळवून घेता येईल यासाठी पूर्ण ताकदीने काम करतोय.

- हिरा पाटील, माजी नगरसेवक

logo
marathi.freepressjournal.in