६३ लाख १२ हजार ५२० मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मतदानासाठी ६५२४ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून या केंद्रांवर देशसेवेला वाहून घेतलेल्या जिल्ह्यातील १५२० सैनिक मतदान करणार आहेत. यात ७६ महिला सैनिकांचा समावेश आहे.
 ६३ लाख १२ हजार ५२० मतदार बजावणार मतदानाचा हक्क

ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ सज्ज झाले आहेत. या तिन्ही मतदारसंघांत ६३ लाख १२ हजार ५२० मतदार आहेत.

मतदानासाठी ६५२४ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून या केंद्रांवर देशसेवेला वाहून घेतलेल्या जिल्ह्यातील १५२० सैनिक मतदान करणार आहेत. यात ७६ महिला सैनिकांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांतील रहिवासी असलेले सैनिक दलाच्या सेवेत कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील रहिवासी आहेत. देशाच्या संरक्षणासाठी असलेल्या कर्तव्यावरील सैनिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यांना पोस्टल बॅलेट पेपर उपलब्ध करून दिले जाणार असून त्यावर त्यांना आवडीच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर बॅलेट पेपर सीलबंद करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in