एफडीआयमध्ये महाराष्ट्र आज पहिल्या क्रमांकावर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बहुस्तरीय वाहनतळाचे भूमिपूजन

मंत्री सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ३५० टॅब देण्यात येणार आहे
एफडीआयमध्ये महाराष्ट्र आज पहिल्या क्रमांकावर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बहुस्तरीय 
वाहनतळाचे भूमिपूजन

ठाणे : महाराष्ट्रातील उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, त्याचबरोबर राज्यात उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. राज्यात उद्योगांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, उद्योगांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. हे सरकार गतिमान सरकार आहे. आपण सर्वांनी गतिमानतेने कामे केली पाहिजेत. आज महाराष्ट्र एफडीआयमध्ये क्रमांक १ चे राज्य आहे. उद्योगांसाठी असलेली ध्येय-धोरणे सुटसुटीत असली पाहिजेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील हॉटेल टिप-टॉप प्लाझा येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथे बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ व "मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा" (मेडिक्लेम पॉलिसी) या कार्यक्रमाप्रसंगी केले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथे बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ व "मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा" (मेडिक्लेम पॉलिसी) शुभारंभ आज हॉटेल टिप-टॉप प्लाझा, लाल बहादूर शास्त्री मार्ग, रहेजा गार्डन समोर, ठाणे पश्चिम येथे संपन्न झाला. त्यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील कॅशलेस आरोग्य सेवा पूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे. “शासन आपल्या दारी” या उपक्रमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २ कोटी ८ लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. प्रशासन याच्यासाठी दिवसरात्र काम करीत आहे, एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहायला नको, यासाठी सर्वजण काम करीत आहेत.

स्वच्छता मोहिमेमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. यावेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ३५० टॅब देण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात काही पाल्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यापुढे दरवर्षी ८ ते १० मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना टॅब वाटपाचे धोरण जाहीर करण्यात आले. औद्योगिक विकास महामंडळातील ४५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा" (मेडीक्लेम पॉलिसी) सुरू करण्यात आली. या विम्याचे हप्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने व दिपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मानसी सोनटक्के यांनी केले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, माजी आमदार रविंद्र फाटक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपिन शर्मा, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विजय राठोड, एमआयटीएलचे एम.डी.मल्लिकनेर, स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी हा आजचा दिवस एैतिहासिक दिवस आहे. गेले १६ महिने हा महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीमध्ये एक नंबरला आहे. हे सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झाले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मागणी करण्याअगोदरच त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. ठाण्यात पार्किंगची व्यवस्था व्हावी व वाहतूकीपासून मुक्ती मिळावी, यासाठी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथे बहुस्तरीय वाहनतळ व्हावे, हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. यासाठी ३४ कोटी रुपये खर्च करून हे बहुस्तरीय वाहनतळ पूर्ण करण्यात आले आहे.

- उदय सामंत, उद्योग मंत्री

हा एक चांगला उपक्रम

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथे बहुस्तरीय वाहनतळ इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था वाढविली पाहिजे. एमआयडीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ८ ते १० च्या पाल्यांना दरवर्षी टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. औद्योगिक विकास महामंडळातील ४५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा" (मेडिक्लेम पॉलिसी) सुरू करण्यात आली. हा एक चांगला उपक्रम एमआयडीसीने राबविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in