कल्याणमध्ये महाराष्ट्रातील पहिला, आगळा वेगळा किन्नर महोत्सव साजरा; बघा फोटो

Published on
महाराष्ट्रातील पहिला आगळा वेगळा किन्नर महोत्सव सोमवारी (दि.१०) कल्याणमध्ये पार पडला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि अस्मिता किन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा महोत्सव अतिशय दिमाखदार पद्धतीने कल्याणच्या प्र.के.अत्रे मंदिरात साजरा झाला.

किन्नर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता मोटीवेशन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

देशभरातील शेकडो ट्रान्सजेंडर, त्यांचे गुरू आणि शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते महोत्सवात सहभागी झाले होते.

महोत्सवादरम्यान, तृतीय पंथीय कलाकारांनी 'हमें देखनी है आझादी' या संगीत गाण्यावर एक सुंदर फॅशन शो सादर केला.

हम अंतरीक्ष से नहीं माँ के पेट से ही आये है' (आम्ही अंतराळातून नाही तर आईच्या पोटातून आलो आहोत), 'हमे जीना है इज्जत से और स्वाभिमान से मरना है' (आम्हाला आदराने जगायचे आहे, आदराने जगायचे आहे) अशा संदेशांसह त्यांच्या वेदना आणि समाजाकडून अपेक्षा व्यक्त करणारे फलक हातात घेतले होते.

तृतीय पंथीय कलाकारांनी श्री गणेश वंदना, लावणी नृत्य, राधा कृष्ण नृत्य, जोगवा आणि किन्नरांच्या हक्काकरीता जनजागृती करण्यासाठी बुरगुंडाचे (ज्ञानप्राप्ती) सादरीकरण असे एकाहुन एक अ‍त्युत्कृष्ठ ,अप्रतिम कार्यक्रमांचे सादरीकरण करुन, उपस्थितांची मने जिंकून घेतली.

यावेळी व्यासपीठावर किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी, आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या डॉ.शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब, किन्नर माँ ट्रस्ट फाऊंडर डॉ.सलमा खान, सोशल ॲन्ड जेन्डर राईट ॲडव्होकेट डॉ.सान्‍वी जेठवानी, हमसफर ट्रस्टचे सीईओ विवेक आनंद, किन्नर समुदायाचे इतर मान्यवर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त संजय जाधव, महापालिकेचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँम्बेसिडर डॉ.प्रशांत पाटील, माजी पालिका सदस्या व इतर मान्यवर उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in