'दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या'...मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात झळकले बॅनर; ठाण्यातील राजकीय वातारण तापले

अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या आमदारांच्या पात्र अपात्र संदर्भातील निकाल बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.
'दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या'...मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात झळकले बॅनर; ठाण्यातील राजकीय वातारण तापले
Published on

ठाणे : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर या निकालाचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात महाविकास आघाडीच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘आज दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली, आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली’ अशा आशयाचे बॅनर ठाण्यात ठिकठिकाणी लावण्यात आले असून, हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरबाजीमुळे ठाण्यातील राजकीय वातारण तापले असून यावरून पुन्हा एकदा वादंग होण्याची चिन्हे आहेत.

अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या आमदारांच्या पात्र अपात्र संदर्भातील निकाल बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालापूर्वी दोन्ही गटात वातावरण चांगलेच तापले होते. मात्र कोणत्याच गटाचे आमदार अपात्र न करता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे तीच खरी शिवसेना असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेत आनंदाचे वातारण आहे. या निकालानंतर ठाण्यात ठिकठिकाणी जल्लोष देखील करण्यात आला.

या निकालानंतर महाविकास आघाडीच्या वतीने ठाण्यात ठिकठिकाणी निषेधाचे बॅनर लावण्यात आले असून, यामध्ये लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या झाली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शहरातील मुख्य चौकात हे बॅनर झळकत आहेत. ‘आज दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली, आणि लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली..’ ‘अब न्याय जनता करेगी…’ असा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला आहे. हे बॅनर ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in