सहा लाखांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्याला अटक

परवानगीपेक्षा जास्तीचे खोदकाम केल्याबाबतचा खोटा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयास सादर न करण्याकरीता महेंद्र पाटील याने दहा लाखांची मागणी केली होती
सहा लाखांची लाच घेताना मंडल अधिकाऱ्याला अटक

ठाणे : ठाणे तहसीलदार कार्यालयातील मंडल अधिकारी महेंद्र पाटील याला सहा लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या कार्यालयातच अटक केली.

परवानगीपेक्षा जास्तीचे खोदकाम केल्याबाबतचा खोटा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयास सादर न करण्याकरीता महेंद्र पाटील याने दहा लाखांची मागणी केली होती. यात सहा लाखांवर तडजोड होऊन त्यातील दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना महेंद्र पाटील (५९) आणि वाजीद महेबुब मलक (६३) या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in