पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा रास्तारोको

केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी विरोधी आणि देश विघातक धोरणाच्या निषेधार्थ घोषणा करण्यात आल्या.
पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा रास्तारोको

पालघर: भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाच्या वतीने संयुक्त किसान मोर्चा संयुक्त किसान मोर्चा आणि केंद्रीय कामगार संघटनेने पुकारलेल्या बंदच्या हाकेला पालघर जिल्ह्यातील नागझरी, तलासरी, डहाणू, कासा, चारोती, वेती, वरोती येथे कडकडीत बंद यशस्वी पाळण्यात आला. डहाणू, कासा, नागझरी येथे रास्तारोको करण्यात आले. दरम्यान नोकर वर्ग, विद्यार्थ्याना याचा त्रास सहन करावा लागला.

केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी विरोधी आणि देश विघातक धोरणाच्या निषेधार्थ घोषणा करण्यात आल्या. कासा येथे चंद्रकांत वरठा, चिंतामण लाबड, बच्चू वाघात, रामदास सुतार, संतोष कोरडा, सुभाष पडवले, गांगरा सुतार, विलास गोवारी, जनक्या कान्हात, राजू सुतार यांनी बंद यशस्वी केला.

सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. तर डहाणू येथे आमदार विनोद नीकोले, चंद्रकांत घोरखना, लहाणी दौडा, रडका कलांगडा, यासह प्रमुख नेत्यांनी नेतृत्व केले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान अनेक ठिकाणी बस सेवा बंद होती. दुपारनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in