डहाणूत गर्भवती आई-बाळाचा मृत्यू; आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

डहाणू तालुक्यातील सारणी गावातील पिंकी डोंगरकर (२६) या गर्भवती महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. पिंकी डोंगरकरला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने तिला मंगळवारी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सिलवासा येथे पाठवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
डहाणूत गर्भवती आई-बाळाचा मृत्यू; आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा उघड
Published on

नितीन बोंबाडे/पालघर

डहाणू तालुक्यातील सारणी गावातील पिंकी डोंगरकर (२६) या गर्भवती महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. पिंकी डोंगरकरला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने तिला मंगळवारी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सिलवासा येथे पाठवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. दरम्यान पिंकीला पुढील उपचारासाठी वेळेवर दाखल करण्यास उशीर झाल्याने गर्भवती पिंकीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे पालघरमधील आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सारणी गावातील पिंकी डोंगरकर या गर्भवती महिलेला मंगळवारी प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने तिला तात्काळ कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे पुरेसी सुविधा उपलब्ध नसल्याने तिला पुढील उपचारासाठी सिलवासा येथील रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र पिंकीला पुढील उपचारासाठी वेळेवर दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. तासाभरानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली. मात्र, सिल्वास येथे पोहोचण्याआधीच, अर्ध्या रस्त्यात पिंकी डोंगरकर आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. पिंकी डोंगरकर यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील समस्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी यावेळी केली आहे.

पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था ही नेहमीच व्हेंटिलेटरवर असल्याचे पहायला मिळते. जिल्हा निर्मितीनंतर दशक उलटूनही पालघर जिल्ह्यामध्ये सक्षम आरोग्य व्यवस्था नसल्याने आरोग्य व्यवस्थेचे नेहमीच दिंडवडे उडत आहेत. अनेक रुग्णांना आरोग्याच्या उत्तम सेवा घेण्यासाठी गुजरातमधील सुरत, वलसाड तसेच सिल्वासा आदी ठिकाणी जावे लागते. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासनाने आजूनपर्यंत कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत, त्यामुळे अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत येणाऱ्या काळामध्ये प्रशासन याबाबत काही योजना करता येतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माझ्या पत्नीला प्रसूती वेदना होत असल्याने आम्ही तात्काळ तिला कासा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तिला पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. सिल्वासा येथे जाण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्यामुळे तिचा रस्त्यात मृत्यू झाला. रुग्णवाहिका वेळेत पोहचली, असती तर माझी पत्नी आणि गर्भातील बाळाचा जीव वाचला असता.

– गणेश डोंगरकर, (मृत पिंकीचा पती)

logo
marathi.freepressjournal.in