हिरवे माथेरान… प्लास्टिकखाली दबले!

पावसाळा सुरू झाला की, माथेरान हे थंड हवामानाचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ पर्यटकांनी गजबजून जाते. ढगांच्या कुशीत चालणे, सरींना अंगावर झेलणे, हिरवळीत निसर्ग अनुभवणे हे सर्व मन मोहवणारे चित्र जितकं रम्य, तितकेच धोक्याचे असल्याची भावना माथेरानकर व्यक्त करत आहेत.
हिरवे माथेरान… प्लास्टिकखाली दबले!
Published on

चंद्रकांत सुतार/माथेरान

पावसाळा सुरू झाला की, माथेरान हे थंड हवामानाचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ पर्यटकांनी गजबजून जाते. ढगांच्या कुशीत चालणे, सरींना अंगावर झेलणे, हिरवळीत निसर्ग अनुभवणे हे सर्व मन मोहवणारे चित्र जितकं रम्य, तितकेच धोक्याचे असल्याची भावना माथेरानकर व्यक्त करत आहेत. पर्यटकांच्या हातातले स्वस्त, रंगीबेरंगी प्लास्टिकच्या रेनकोटमुळे माथेरानमधील निसर्ग गुदमरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

नेरळपासून माथेरानपर्यंतच्या वाटेवर ठिकठिकाणी १० ते ५० मायक्रॉन जाडीचे थर्मोप्लास्टिक रेनकोट्स मोठ्या प्रमाणावर विकले जातात. पर्यटक ते एकदाच वापरतात आणि मग कुठेही फेकून देतात. रस्त्यावर, पायवाटांवर, जंगलात, अगदी रेल्वे ट्रॅकवर सुद्धा! हे प्लास्टिक Polyethylene व PVC प्रकारातले असून शेकडो वर्षांपर्यंत विघटित होत नाही.

विशेष म्हणजे माथेरानमध्ये येणारा पर्यटक वर्ग प्रामुख्याने सुशिक्षित असतो. सुशिक्षितांकडून पर्यावरणाविषयी अधिक जागरूकतेची अपेक्षा असते.

logo
marathi.freepressjournal.in