बाळकुम-धामणकर नाकादरम्यान मेट्रो वर्षअखेरीस; ठाणे, भिवंडी, कल्याण यांना जोडणाऱ्या मेट्रो ५ चे काम जोरात

ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर व परिसराला जोडणाऱ्या मेट्रो लाइन ५ या सेवेच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून तो या वर्षअखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यात ठाण्यातील बाळकुम ते धामणकर नाका या दरम्यान मेट्रो धावू लागेल.
बाळकुम-धामणकर नाकादरम्यान मेट्रो वर्षअखेरीस; ठाणे, भिवंडी, कल्याण यांना जोडणाऱ्या मेट्रो ५ चे काम जोरात
बाळकुम-धामणकर नाकादरम्यान मेट्रो वर्षअखेरीस; ठाणे, भिवंडी, कल्याण यांना जोडणाऱ्या मेट्रो ५ चे काम जोरात
Published on

मुंबई : ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर व परिसराला जोडणाऱ्या मेट्रो लाइन ५ या सेवेच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून तो या वर्षअखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यात ठाण्यातील बाळकुम ते धामणकर नाका या दरम्यान मेट्रो धावू लागेल.

मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाइन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प आकार घेत आहे. त्याच्या विस्तारीत टप्प्याला मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गिकेची एकूण लांबी आता ३४.२१ किमी झाली असून ती एमएमआरमधील सर्वात मोठ्या मेट्रो मार्गिकांपैकी एक ठरणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा ‘सीएमआरएस’ तपासणीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून वर्षाअखेर हा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

मेट्रो मार्ग ५ चा विस्तार असलेला मेट्रो मार्ग ५ए ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि आसपासच्या भागांना जोडणार आहे. यापूर्वी मेट्रो मार्ग ५ ची लांबी २२.३८ किमी होती. ११.८३ किमी लांबीच्या मेट्रो मार्ग ५ए च्या समावेशानंतर या संपूर्ण मार्गिकेची एकूण लांबी आता ३४.२१ किमी होणार आहे. विस्तारीकरणानंतर मेट्रो लाईन ५ प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च १८,१३० कोटी इतका झाला आहे.

विशेषतः भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली परिसरासाठी ही मार्गिका महत्वाची ठरणार आहे. आशियातील सर्वात मोठ्या वस्त्रोद्योग आणि वेअरहाऊसिंग हबपैकी एक असलेले भिवंडी, तसेच ३५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेला कल्याण–डोंबिवली परिसर, यांना जलद आणि उच्च क्षमतेची कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचा पूर्ण विकास साधता येईल. हा विस्तारित कॉरिडॉर उपनगरीय रेल्वे आणि प्रमुख महामार्गांशी सुरळीतपणे जोडला जाईल, ज्यामुळे लाखो नागरिकांना अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास मिळेल.

“मेट्रो लाईन ५ फेज १ चे काम आता प्रगत टप्प्यात पोहोचले आहे. स्थानकांची पायाभूत सुविधा हळूहळू आकार घेत आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या सीएमआरएस तपासणीची आम्ही तयारी करत आहोत. मार्गिका सुरू झाल्यानंतर ‘मुंबई इन मिनिट्स’ या संकल्पनेला मोठी गती मिळेल आणि या भागातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.

इंटरचेंज सुविधा

  • मेट्रो लाइन ४ येथे बाळकुम (कापूरबावडी).

  • मेट्रो लाइन १२ येथे कल्याण जंक्शन.

उपनगरीय रेल्वे स्थानकांशी थेट जोडणी

  • ठाणे

  • कल्याण

  • विठ्ठलवाडी

  • उल्हासनगर

विस्तारीत मार्गिका आणि प्रकल्पाचा आढावा

  • टप्पा १ : ठाणे ते धामणकर नाका

  • लांबी : ११.९ किमी

  • स्थानके : ६

  • स्थानकांची नावे : बाळकुम , कशेळी , काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा, धामणकर नाका

  • अंदाजित खर्च : ६,७४१ कोटी

  • टप्पा २ : धामणकर नाका ते दुर्गाडी

  • लांबी : १०.४८ किमी

  • स्थानके : ६ (१ भूमिगत + ५ उन्नत)

  • स्थानकांची नावे : भिवंडी (भूमिगत), टेमघर, राजनोली, गोवे गाव, कोनगाव (पू.), कोनगाव (प.).

  • अंदाजित खर्च : ७,३२६ कोटी

  • टप्पा ५ अ : दुर्गाडी-खडकपाडा-भोईरवाडी- कल्याण तसेच उल्हासनगर जोडणी

  • लांबी : ११.८३ किमी

  • स्थानके : ७ (सर्व उन्नत)

  • स्थानकांची नावे : दुर्गाडी, खडकपाडा, भोईरवाडी, छत्रपती शिवाजी महाराज पथ, शांतिनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, उल्हासनगर

  • विशेष वैशिष्ट्य : भोईरवाडी येथून उल्हासनगरसाठी स्वतंत्र स्पर कनेक्टिव्हिटी

  • अंदाजित खर्च : ४,०६३ कोटी

logo
marathi.freepressjournal.in