ठाणे स्थानकात गर्डर लॉंचसाठी मध्यरात्री ब्लॉक

ठाणे स्थानकात कल्याणच्या दिशेला पादचारी पुलावर गर्डर लॉंच करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत पाच तासांचा जंम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे.
ठाणे स्थानकात गर्डर लॉंचसाठी मध्यरात्री ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे ठाणे स्थानकाच्या ५.०० मीटर रुंद एफओबी (कल्याण टोकाला) साठी गर्डर्स लाँच करण्यात येणार आहे. यासाठी विशेष वाहतूक, पॉवर ब्लॉक  घेण्यात येणार आहे. अप जलद, ५वी, ६वी, अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईन्स (स्पॅन-६) किमी ३२/.१४०टी क्रेनचा वापर करण्यात येणार आहे. ५ व्या लेनवर शनिवारी रात्री १०.१० ते रविवार पहाटे ३.४० वाजेपर्यंत तर सहाव्या लेनवर शनिवार रात्री १२.१० ते रविवारी पहाटे २.३० वाजेपर्यंत काम होणार आहे. या कालावधीत मेल एक्स्प्रेस दिवा स्थानकातून अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉकच्या कालावधीत पनवेल स्थानकातून ठाण्याच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल पनवेल स्थानकातून ८.५१ वाजता, तर वाशी स्थानकातून ठाण्याच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल वाशी स्थानकातून ९.२५ वाजता सुटेल.

ठाणे स्थानकात कल्याणच्या दिशेला पादचारी पुलावर गर्डर लॉंच करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत पाच तासांचा जंम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत मेल एक्स्प्रेस दिवा स्थानकातून वळवण्यात येतील, तर काही लोकल उशीराने धावतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल रद्द

-ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन्सवर रद्द राहतील.

-डाउन ट्रान्स हार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल ठाणे येथून २१.५२ वाजता सुटेल आणि पनवेल येथे २२.४६ वाजता पोहोचेल.

-अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वाशी येथून २१.२४ वाजता सुटेल आणि ठाणे  येथे २१.५३ वाजता पोहोचेल.

-अप ट्रान्सहार्बर लाईनवरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून २०.५१ वाजता सुटेल आणि ठाणे येथे २१.४६ वाजता पोहोचेल.

logo
marathi.freepressjournal.in