दुधाच्या टेम्पोने तिघींना चिरडले: जैन साध्वीसह महिलेचा मृत्यू; एक गंभीर जखमी

जखमी झालेल्या ओसवाल यांना पुढील उपचारासाठी तातडीने पनवेल येथे नेण्यात आले. मागून येत असलेल्या तीन जैन साध्वी व जैन महिला सुरक्षित आहेत.
दुधाच्या टेम्पोने तिघींना चिरडले: जैन साध्वीसह महिलेचा मृत्यू; एक गंभीर जखमी

कर्जत : सोमवारी पहाटेच्या सुमारास खोपोलीहून कर्जतला आलेल्या चार जैन साध्वी व त्यांच्याबरोबर असलेल्या जैन महिलांना कर्जतहून नेरळकडे जात असताना मागून येणाऱ्या सुसाट दुधाच्या टेम्पोने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, त्या टेम्पोने तिघींना चिरडले. यामध्ये एक जैन साध्वी व एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक भगिनी गंभीर जखमी झाली. जखमी झालेल्या महिलेला पुढील उपचारासाठी पनवेलकडे नेण्यात आले. या घटनेमुळे कर्जत परिसरात शोककळा पसरली असून, जैन बांधवांची दुकाने सोमवारी दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. धडक देऊन पळून चाललेल्या टेम्पोचालकाला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सोमवारी पहाटे कर्जतहून चार जैन साध्वी नेरळकडे जात होत्या. त्यांच्याबरोबर काही जैन महिलाही होत्या. यापैकी मौलिकपूर्णा श्रीजी, लता हिंगड, दिवाली ओसवाल हे कर्जत-कल्याण मार्गावरील वांजळे गावानजीक पुढे चालत जात असता, मागून भरधाव येणाऱ्या दुधाच्या टेम्पोने या तिघींना जोरदार धडक दिली. या धडकेत मौलिकपूर्णा श्रीजी (५१ वर्ष) आणि लता हिंगड (३५ वर्ष) या चिरडल्या गेल्याने जागीच मृत्यू झाल्या, तर दिवाली ओसवाल (३६वर्ष) या गंभीर जखमी झाल्या. जखमी झालेल्या ओसवाल यांना पुढील उपचारासाठी तातडीने पनवेल येथे नेण्यात आले. मागून येत असलेल्या तीन जैन साध्वी व जैन महिला सुरक्षित आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. धडक देऊन पळून चाललेल्या टेम्पोचालकाला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in