अल्पवयीन मुलींचा बसचालकाकडून 'विनयभंग'

नेरळ येथे सहलीसाठी आलेल्या पाच शाळकरी अल्पवयीन मुलींवर बसचालकाकडूनच विनयभंग केल्याचा प्रकार घडला.
अल्पवयीन मुलींचा बसचालकाकडून 'विनयभंग'

कर्जत : नेरळ येथे सहलीसाठी आलेल्या पाच शाळकरी अल्पवयीन मुलींवर बसचालकाकडूनच विनयभंग केल्याचा प्रकार घडला. नेरळ पोलिसांकडून आरोपी बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुलुंड येथील सेवन आईल्स इंटरनॅशनल स्कूलमधील शालेय विद्यार्थी खासगी बसने नेरळ-मालेगाव येथील सगुणा बाग येथे सहलीसाठी आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुलुंड सेवन आइल्स इंटरनॅशनल स्कूल या शालेय विद्यार्थ्यांची सहल ही नेरळ मालेगाव येथील प्रसिद्ध असे कृषी पर्यटन स्थळ असणाऱ्या सगुणा बाग येथे फिरण्यासाठी म्हणून निघाली होती. या शाळेचे विद्यार्थी व शिक्षक हे बस क्रमांक एमएच ४३ बीपी ४२९८ मध्ये बसचालक अंकुश संजय अडागळे (२८) सोबत निघाले होते. सकाळी ९ वाजता ही बस नेरळ-मालेगाव येथील कृषी पर्यटन असलेल्या सगुणा बाग येथे पोहचली होती तर येथील निसर्गाचा आनंद घेत येथील विद्यार्थी व शिक्षक बसमध्ये बसून परतीच्या प्रवासाला म्हणजे सायंकाळी सहा वाजता निघाले असता ही बस रात्री उशिरा आपल्या मुलुंड शाळेजवळ पोहचली होती. बसमध्ये आपल्यासोबत चालकाकडून घडलेल्या गैरवर्तणुकीची माहिती पाच विद्यार्थिनींनी घरी पोहचल्यानंतर पालकांना दिली.

याबाबत पालकांनी शालेय व्यवस्थापक व शिक्षकांना माहिती दिली तर मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत घडल्याने याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तर चालक अंकुश संजय अडागळे याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे तर नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दहातोंडे हे तपास घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in