शासनाच्या योजना राबविण्यासाठी नावीन्यता कक्षाची स्थापना, पालिकेकडून तीन वर्षांसाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती

मीरा-भाईंदर महापालिकेकडून शहरात विविध विकासकामे सुरू आहेत तसेच शासनाच्या अनेक योजना राबवत आहे.
शासनाच्या योजना राबविण्यासाठी नावीन्यता कक्षाची स्थापना, पालिकेकडून तीन वर्षांसाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती
Published on

भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिकेकडून शहरात विविध विकासकामे सुरू आहेत तसेच शासनाच्या अनेक योजना राबवत आहे. या विविध योजना व उपक्रम राबवण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र नावीन्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेने तीन वर्षांसाठी विशेष अधिकारी नियुक्त करून त्यासाठी २ कोटी १७ लाखांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेत गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे शहरातील विकासाची कामे करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. प्रशासकीय राजवटीत शहरामध्ये अनेक विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तसेच महापालिकेच्या विविध विभागाद्वारे शहरात अनेक उपक्रम व योजना राबविल्या जात आहेत. या योजना व शासनाचे उपक्रम राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता जाणवते त्यामुळे या योजना प्रभावीपणे राबवण्यास अडचण निर्माण होत असतात. या योजना अधिकाऱ्यांकडून सक्षमपणे राबवल्या जात नाहीत.

महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी हे काम करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिकाऱ्यांची नियुक्ती करत असताना त्यांनी नव्याने नावीन्यता कक्षाची स्थापना देखील करण्यात आली आहे. या कक्षाचे कामकाज पाहण्यासाठी त्याला लागणारा खर्च यासाठी तीन वर्षांच्या खर्चास मान्यता देणारा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

कामाला गती मिळणार

नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यासोबत समन्वय साधून काम करायचे आहे. या मुळे या योजना व उपक्रम राबवण्यासाठी कामाला गती मिळणार असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. या स्थापन केलेल्या नावीन्यता कक्षामध्ये प्रकल्प अधिकारी

- १, प्रकल्प प्रमुख-१,

प्रकल्प व्यवस्थापक-२, क्षेत्र विशेषज्ञ -१, नगररचना अभियंता-१, प्रस्तुति व दस्तावेज विशेषज्ञ -१, पर्यावरण

सल्लागार -१, उपक्रम तज्ज्ञ-१, वाहतूक अभियंता -१ या पदाची निर्मिती करून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in