मीरा-भाईंदर आर्ट्स फेस्टिव्हलला जल्लोषात सुरुवात, दिग्गज कलाकारांसह एकूण १५० कलाकारांचा सहभाग

मीरा-भाईंदरमध्ये ज्या फेस्टिव्हलने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्या 'विहंग संस्कृती मीरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल'ला जल्लोषात सुरुवात झाली आहे.
मीरा-भाईंदर आर्ट्स फेस्टिव्हलला जल्लोषात सुरुवात, दिग्गज कलाकारांसह एकूण १५० कलाकारांचा सहभाग

भाईंंदर : मीरा-भाईंदरमध्ये ज्या फेस्टिव्हलने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्या 'विहंग संस्कृती मीरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल'ला जल्लोषात सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी मीरा-भाईंदर शहरातील सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारी भव्य शोभायात्रा निघाली. या कला महोत्सवातील सगळ्याच गोष्टी रसिकांचे लक्ष वेधून घेत असून 'वॅक्स म्युझियम'मधील मेणाचे पुतळे पाहण्यासाठी ही मोठी गर्दी होत आहे.

मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांची सांस्कृतिक गरज पूर्ण करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी ६ वर्षांपूर्वी 'संस्कृती मीरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल'ला सुरुवात केली असून यंदा प्रताप सरनाईक फाऊंडेशनतर्फे 'संस्कृती मीरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल' स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक, भाईंदर पूर्व येथे फेस्टिव्हल कालपासून सुरू झाले आहे. फेस्टिव्हल उद्घाटनाच्याआधी मीरा-भाईंदर शहरातील ऐक्याचे दर्शन घडविणाऱ्या शोभायात्रेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

गायिका मैथिली ठाकूर यांचा गाण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, शिवसेना मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख राजू भोईर, शिवसेना विधानसभा महिला संघटक परिषा सरनाईक, विधानसभा क्षेत्र प्रमुख सचिन मांजरेकर व विक्रम प्रताप सिंह, उद्योजक विहंग सरनाईक व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या फेस्टिव्हलसाठी परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली असून मैदान पूर्णपणे सजविण्यात आले आहे.

दिग्गज कलाकारांसह एकूण १५० कलाकारांचा या महानाट्यमध्ये सहभाग असणार आहे. हे महानाट्य पाहण्यासारखे असून हे नाट्य पाहण्यासाठीही सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘वॅक्स म्युझियम’चे आकर्षण

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार शशिकांत धोत्रे यांचे चित्र प्रदर्शन या फेस्टिव्हलमध्ये असून ते पाहण्यासारखे आहे. 'वॅक्स म्युझियम' म्हणजेच मेणाचे पुतळे पाहण्यासाठी लोकांना दूर दूर जावे लागते. मीरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हलमध्ये 'वॅक्स म्युझियम'चे दालन सगळ्यात गर्दीचे ठरत असून त्यात २५ प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे लोकांना पाहता येत आहेत. हुबेहुब हे पुतळे आहेत. त्याच बरोबर एक भव्य अशी प्रभू श्रीरामाची रांगोळी काढण्यात आली असून त्यात रामायणातील महत्त्वाचे प्रसंग ते श्रीराम मंदिर असा क्रम रंगोळीतून दाखविण्यात आला आहे, ही रांगोळी ही बघण्यासारखी आहे.

logo
marathi.freepressjournal.in