मीरा-भाईंंदरमध्ये मराठी महापौरपदासाठी आंदोलन; सर्वपक्षीय पदाधिकारी, संस्था, विविध संघटना एकत्र

मीरा-भाईंदर शहरात मराठी व स्थानिक व्यक्तीच महापौर व्हावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, मंडळे व विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते.
मीरा-भाईंंदरमध्ये मराठी महापौरपदासाठी आंदोलन; सर्वपक्षीय पदाधिकारी, संस्था, विविध संघटना एकत्र
Published on

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात मराठी महापौराच्या मागणीसाठी २ फेब्रुवारीला सुभाषचंद्र बोस मैदान येथे आंदोलन आणि ३ फेब्रुवारीला सुभाषचंद्र बोस ते महापालिका असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन अप्पर पोलीस आयुक्त शिंदे यांना पोलीस आयुक्तालयात सादर केले गेले आहे.

मराठी महापौरासाठी प्रशासनाला शांततामय निवेदन मंगळवारी मराठी एकीकरण समिती व मनसेच्या माध्यमातून दिले गेले. मीरा-भाईंदर शहरात मराठी व स्थानिक व्यक्तीच महापौर व्हावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, मंडळे व विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते.

संदीप राणे यांनी पुढे सांगितले की, आमदार मेहता व भाजप जिल्हाध्यक्ष यांची भेट घेऊन मराठी महापौराच्या मागणीसाठी चर्चा करणार आहेत. गोवर्धन देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ३ फेब्रुवारीला मराठी अस्तित्त्वासाठी मराठी माणसांनी एकत्र येणे गरजेचे आहे. या मागणीवर पुढील काही दिवसांत राजकीय व सामाजिक घडामोडी वेगाने होण्याची शक्यता आहे.

मीरा-भाईंदरचा महापौर मराठी व स्थानिक असावा, ही सामान्य मराठी नागरिकांची भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आली. जर मराठी महापौर झाला नाही, तर मराठी लोक एकत्र येऊन तीव्र आंदोलन करतील. येत्या दोन तारखेला उग्र आंदोलन होणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त कार्यालयात दिला गेला आहे.
गोवर्धन देशमुख, अध्यक्ष मराठी एकीकरण समिती

आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. मात्र मीरा-भाईंदरमध्ये मराठी व्यक्तीलाच महापौरपद मिळाले पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. जर येथे मराठी महापौर झाला नाही, तर कोणत्याही स्तरावर संघर्ष करण्यास आम्ही मागे पाहणार नाही.

संदीप राणे, मनसेचे शहराध्यक्ष

logo
marathi.freepressjournal.in