मीरा-भाईंदरमध्ये ४८ ठिकाणी महिला आरक्षण; महिला OBC आरक्षणामुळे अनेक माजी नगरसेवकांचे राजकीय गणित बिघडले

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाली. या सोडतीत महिलांना सर्वाधिक ४८ जागांचे आरक्षण मिळाल्याने ‘महिला राजकीय सहभाग’ अधिक बळकट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मीरा-भाईंदरमध्ये ४८ ठिकाणी महिला आरक्षण; महिला OBC आरक्षणामुळे अनेक माजी नगरसेवकांचे राजकीय गणित बिघडले
Published on

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाली. या सोडतीत महिलांना सर्वाधिक ४८ जागांचे आरक्षण मिळाल्याने ‘महिला राजकीय सहभाग’ अधिक बळकट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ९५ जागांपैकी २५ जागा ओबीसी प्रवर्गासाठी, ४ जागा अनुसूचित जातीसाठी तर १ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

एकूण सदस्यसंख्या व प्रवर्गनिहाय आरक्षण

एकूण सदस्य : ९५, महिला आरक्षण : ४८, अनुसूचित जाती (SC) : ४ जागा, अनुसूचित जमाती (ST) : १ जागा, नागरिकांचा मागासवर्ग (OBC) : २५ जागा,

सर्वसाधारण (General) : ६५ जागा, त्यापैकी ३३ जागा महिलांसाठी आरक्षित, अनुसूचित जाती (SC) आरक्षण - ४ प्रभाग

प्रभाग क्रमांक : ११-अ, १३-अ, १४-अ, १८-अ यापैकी ११-अ आणि १४-अ प्रभागांमध्ये SC महिला आरक्षित जागा आहेत.

अनुसूचित जमाती (ST) आरक्षण : १ प्रभाग

प्रभाग क्रमांक : १४-ब

(महिला/पुरुष दोघांसाठी खुली आरक्षित ST जागा)

नागरिकांचा मागासवर्ग (OBC) २५ जागा

OBC आरक्षित जागांचे प्रभाग : महिला आरक्षित (१३ जागा):

१-अ, ३-अ, ४-अ, ५-अ, ६-अ, ८-अ, ११-ब, १३-ब, १४-ब,

१८-ब, २०-अ, २१-अ, २३-अ

महिला/पुरुष (१२ जागा): २-अ

४-ब, ७-अ, ९-अ, १०-अ, १२-अ, १५-अ, १६-अ, १७-अ,

१९-अ २२-अ, २४-अ

OBC प्रवर्गातील एकूण आरक्षण : २५ जागा (२४ प्रभागांमध्ये; प्रभाग ४ मध्ये २ जागा)

सर्वसाधारण (General) - ६५ जागा

१) सर्वसाधारण महिला - ३३ जागा

१) सर्वसाधारण (महिला) - २२ जागा

प्रभाग क्रमांक :

१-ब, ३-ब, ४-क, ५-ब, ६-ब, ८-ब, १३-क, १८-क,

२०-ब, २१-ब, २३-ब

तसेच खालील प्रभागांमध्ये प्रत्येकी २ महिला जागा :

२-ब व २-क

७-ब व ७-क

९-ब व ९-क

१०-ब व १०-क

१२-ब व १२-क

१५-ब व १५-क

१६-ब व १६-क

१७-ब व १७-क

१९-ब व १९-क

२२-ब व २२-क

२४-ब व २४-क

२) सर्वसाधारण

(महिला/पुरुष) ३२ जागा

प्रभाग क्रमांक : १-क व १-ड, ३-क व ३-ड, ५-क व ५-ड,६-क व ६-ड, ८-क व ८-ड, ११-क व ११-ड, २०-क व २०-ड, २१-क व २१-ड, २३-क व २३-ड

तसेच स्वतंत्र जागा : २-ड, ४-ड, ७-ड, ९-ड, १०-ड, १२-ड, १३-ड, १४-ड, १५-ड, १६-ड, १७-ड, १८-ड, १९-ड, २२-ड

जनगणना व संरचना

२०११ ची जनगणना लोकसंख्या : ८,०९,३७८

  • अनुसूचित जाती (SC) : ३०,२४३

  • अनुसूचित जमाती (ST) : १२,५९६

  • प्रभाग : २४

२३ प्रभाग : ४ सदस्यीय

१ प्रभाग : ३ सदस्यीय एकूण ९५ सदस्यांपैकी ३० जागांवर प्रवर्गनिहाय आरक्षण आहे.

logo
marathi.freepressjournal.in