मीरा -भाईंदर महापालिका कर्मचारी पतपेढीच्या निवडणुका जाहीर

मीरा- भाईंदर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सार्वजनिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.
मीरा -भाईंदर महापालिका कर्मचारी पतपेढीच्या निवडणुका जाहीर

भाईंदर : मीरा- भाईंदर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सार्वजनिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. १९ सदस्यीय संचालक मंडळासाठी १६ मार्च रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर राठोड यांनी दिली आहे. याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. इच्छुक उम्मीदवारांचे नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.

मीरा-भाईंदर महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक २०१६-१७ मध्ये पार पडली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली होती. त्यानंतर सहकार पॅनलच्या संचालक मंडळाने उपनिबंधक कार्यालयाकडून मुदतवाढ घेतली होती. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला. सध्याचे संचालक मंडळ गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत आहे. सहकार पॅनलचे संस्थापक गोविंद परब यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सहकार पॅनल, श्रमजीवी संघटना, झुंज जनरल कामगार यूनियन आणखी काही संघटना निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तत्कालीन सहकार पॅनलच्या उमेदवारांची यंदाच्या निवडणुकीत चांगलीच दमछाक होणार असल्याचे दिसत आहे. भाजपा प्रणीत झुंज जनरल कामगार यूनियन च्या उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले. तर मंगळवारी सहकार पॅनलने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सहकार पॅनल प्रणित ( जुने सत्ताधारी ) प्रकाश बोराडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे. संस्थापक कै. गोविंद परब यांचे आशिर्वाद आणि विचार पुढे नेण्याचा प्रयत्न, गोविंद परब यांनी लावलेले रोपटे, आज ३० वर्षांत वृक्ष झाले आहे, त्याचे रक्षण करणे आमचे सर्वांचे काम आहे असे प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in