Badlapur : सहा वर्षांच्या मुलीसोबत अल्पवयीन मुलाचे गैरकृत्य

याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून सदर अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
Badlapur : सहा वर्षांच्या मुलीसोबत अल्पवयीन मुलाचे गैरकृत्य
Badlapur : सहा वर्षांच्या मुलीसोबत अल्पवयीन मुलाचे गैरकृत्य
Published on

बदलापूर : एका सहा वर्षीय मुलीसोबत एका अल्पवयीन मुलाने गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून सदर अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

बदलापूर पश्चिम भागात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाने या ६ वर्षाच्या मुलीला खेळायच्या बहाण्याने बोलवून घेतले. आणि या मुलीला नको तिथे स्पर्श करत, तिच्यासोबत गैरकृत्य केले. हा प्रकार घडल्यानंतर ही पीडित मुलगी शाळेच्या वेळेत शाळेत जायचं नाही असं घाबरून आईला सांगत होती, यावेळी आपली मुलगी असं का करते? याबाबत तिच्या आईला संशय आला. त्यामुळे आईने मुलीला विश्वासात घेतल्यानंतर, मुलीने घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर संतप्त झालेल्या मुलीच्या पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गाठत या प्रकाराबाबत तक्रार दिली.

बदलापूर पोलिसांनी या संवेदनशील घटनेचे गांभीर्य ओळखून, तात्काळ पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in