मराठी पाट्यांवरून मनसे पुन्हा आक्रमक; ठाण्यात दुकानदारांना मनसेचा तीन दिवसांचा अल्टिमेटम

आस्थापनेचे नावाची पाटी ही देवनागरी मराठी भाषेतील जरी असेल तरी त्यावरती अक्षर लेखन हे नाम फलकावर सुरुवातीलाच मराठी भाषेत असणे देखील आवश्यक आहे.
मराठी पाट्यांवरून मनसे पुन्हा आक्रमक; ठाण्यात दुकानदारांना मनसेचा तीन दिवसांचा अल्टिमेटम

राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या लावणे हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहेत. मराठी पाट्या लावण्यावरून मनसे परत एकदा आक्रमक झाली आहे. ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना मराठी पाट्या लावण्यासाठी तीन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्याचवेळी ठाणे मनपा आयुक्तही अँक्शन मोडवर असल्याचं पहायला मिळत आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी मराठी पाट्या नसतील तर शहानिशा करून नोटीस बजावत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मनसेचे पदाधिकारी स्वप्नील मेहेंद्रकर यांच्यासोबत मनसेचे सैनिक दुकानात घुसून व्यापाऱ्यांनशी चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील काही ठिकाणी अजून मराठी पाट्या लावल्या नाहीत त्यामुळे ठाणे महापालिकेच्या वतीने 9 प्रभाग समितीमध्ये असणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी देखील दुकाने विविध आस्थापनांवर मराठी पाट्या नसतील तर त्यावरती शहानिशा करून ताबोडतोब नोटीस बजावत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

आस्थापनेचे नावाची पाटी ही देवनागरी मराठी भाषेतील जरी असेल तरी त्यावरती अक्षर लेखन हे नाम फलकावर सुरुवातीलाच मराठी भाषेत असणे देखील आवश्यक आहे. तसंच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक इतर कोणत्या भाषेतील अक्षरांचा टंक आकारापेक्षा लहान असणार नाही याची संबंधित सहाय्यक आयुक्तांनी कारवाई करताना खबरदारी घ्यावी, असेही पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषेचा आदर करायला हवा असं मनसे प्रमुख राज ठाकरे याचं सुरुवातीपासूनच मत होते. मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली होती. त्यात अजून कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अनेक ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर ठाण्यात दुकानांच्या पाट्यासंदर्भात मनसेचे आंदोलन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in