मनसे नेते अविनाश जाधवांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडे तक्रार दाखल

मनसे नेते अविनाश जाधवांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडे तक्रार दाखल

मनसेचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर उचलले पाऊल
Published on

एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनधिकृत मशिदींविरोधात राज्यभर कारवाई करण्यास सुरु केली असताना मनसेचे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यासंदर्भात, मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरेंनी नौपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात आता ठाणे पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज्यभरातील अनधिकृत मशीद, मजार उभारणीकडे व्हिडीओच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मनसेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अनधिकृत मशिदींविरोधात तक्रारी केल्या. राज ठाकरेंच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी मनसे नेते अविनाश जाधवांनी मुंब्रा येथील डोंगरामध्ये वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणला. यावेळी त्यांनी प्रशासनाला १५ दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासन व वनविभागाने मुंब्रा डोंगरावर पाहणी करत चौकशी सुरु केली. यानंतर हा त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारी ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचे समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in