विधानसभेसाठी ठाण्यात मनसेची मोर्चेबांधणी, गणेश मंडळांना देणार राज ठाकरे भेटी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी ठाण्यात येऊन चारही विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेणार आहेत.
विधानसभेसाठी ठाण्यात मनसेची मोर्चेबांधणी, गणेश मंडळांना देणार राज ठाकरे भेटी
ANI
Published on

ठाणे : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून सुरुवात केली असताना दुसरीकडे मनसेनेही आता विधानसभेसाठी ठाण्यातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी ठाण्यात येऊन चारही विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनीही जोरदार तयारी केली आहे.

विधानसभेची निवडणूक येत्या दोन महिन्यात कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ठाण्याला राजकीय दृष्ट्या राज्यातच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने ठाण्यात मोठ्या प्रमाणात उडणार असून यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आतापासूनच मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे आता मनसेने देखील गणेशोत्सवाचे औचित्य साधून ठाण्यातूनच विधानसभेसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे आज (दि.११ सप्टेंबर) रोजी ठाण्यातील ठाणे, कोपरी पाचपाखाडी,ओवळा-माजिवडा आणि मुंब्रा-कळवा या चारही विधानसभा क्षेत्रातील गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. राज ठाकरे यांच्या येण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह निर्माण झाला आहे. राज ठाकरे हे संध्याकाळी हा दौरा होणार असून या दौऱ्याची कार्यकर्त्यांकडून देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in