भाजपच्या बॅनरवर झळकले मनसेचे एकमेव आमदार ; चर्चांना उधान

नाशिक टोलनाका तोडफोड प्रकरणी दोन्ही पक्षातील संबंध ताणले गेले असताना या बॅनरमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
भाजपच्या बॅनरवर झळकले मनसेचे एकमेव  आमदार ; चर्चांना उधान
Published on

नाशिक जिल्हातील समृद्धी महामार्गावरील टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे आणि भाजप यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. सोशल मीडियावर एकमेकांविरोधात प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहेत. असं असताना स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षामध्ये सलोख्याचे संबंध असल्याचं दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर एक बॅनर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या बॅनवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा फोटो असल्याने सर्वत्र चर्चांना उधान आलं आहे.

भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी १४ गावांच्या विकासासाठी निधी दिल्याने त्यांचे आभार मानणारे हे बॅनर आहे. १४ गाव सर्व पक्षिय विकास समितीच्या वतीने हे बॅनर लावण्यात आलं आहे. सध्या या बॅनरचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील व विकास समिती सातत्याने पाठपूरावा करत असल्याने त्या कामाला यश आलं. त्यामुळे हे बॅनर लावल्याचं बोललं जात आहे.

मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने सिन्नर तालुक्यातील गोंदी टोलनाका मनसैनिकांनी फोडला होता. याचे सर्वदूर पडसाद उमटले होते. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरुन याप्रकरणी अमित ठाकरेंना लक्ष केलं गेलं होते. मनसे नेते संदीप देशपांडे यांना याप्रकरणी भाजपला चांगलं सुनावलं होतं. तसंच मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी देखील फोडाफोडीच्या राजकारणावरुन भाजपला टोला लगावला होता. आता भाजपच्या बॅनवरचं त्यांचा फोटो झळकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in