मिरा भाईंदरमध्ये गेल्या ६ महिन्यात सोळाशेहून अधिक गुन्हे उघडकीस

आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गुन्हे वाढत असताना हे गुन्हे उघडकीस आणून त्याची उकल करण्यामध्ये पोलीस आयुक्तालय राज्यात आघाडीवर आहे.
मिरा भाईंदरमध्ये गेल्या ६ महिन्यात सोळाशेहून अधिक गुन्हे उघडकीस

मिरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते जून ह्या गेल्या ६ महिन्यात पोलिसांनी २३७९ पैकी १६४७ इतके गुन्हे उघड़कीस आणले आहेत.

पोलिसांनी ६ महिन्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात खून(२४), खुनाचा प्रयत्न(१८), दरोडा(४), चैन जबरी चोरी(१७), इतर जबरी चोरी १११, दिवसा घरफोडी(२६), रात्री घरफोडी (२२९), ववाहनचोरी(४०७), बलात्कार(१६४), विनयभंग(३०२), जुगार(६८) व अमली पदार्थ चे ४४५ गुन्हे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध १६, पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

सदर प्रकारच्या ६ महिन्यातील दाखल गुन्ह्यांची संख्या २३७९ असून पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांची संख्या जवळपास १६४७ इतकी आहे.

गुन्हे करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक केली जात आहे. आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गुन्हे वाढत असताना हे गुन्हे उघडकीस आणून त्याची उकल करण्यामध्ये पोलीस आयुक्तालय राज्यात आघाडीवर आहे. पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकारी हे शहरात घडणाऱ्या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन त्याचा तपास योग्यरित्या करण्याचे निर्देश देतात. त्या तपासासाठी लागणारी मदत व मार्गदर्शन करत असल्याचे अधिकारी सांगत आहेत त्यामुळे गुन्हे उघडकीस येण्यास मदत होते.

पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी बाबत दर महिन्याला बैठक घेऊन तपासाची माहिती घेतली जाते. ज्या त्या पोलीस ठाण्यात आपत्कालीन परिस्थिती असेल व अधिकाऱ्यांना पोहोचणे शक्य नसेल तर ऑनलाईन बैठक घेतली जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांचा वेळ वाचतो व कार्यालयीन आणि गुन्हे, तक्रारीची कामे करायला वेळ मिळतो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in